Asha Bhosle : आशा भोसलेंच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेताना रेश्मी ठाकरे, सचिन तेंडुलकरला अश्रु अनावर
Asha Bhosle : ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख, गायिका अनुराधा पौडवाल, अभिनेता रितेश देशमुख यांनीही आशा भोसले यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

Asha Bhosle : सिनेसृष्टीतील प्रसिद्ध आणि दिग्गज पार्श्वगायिका आशा भोसले (Asha Bhosle) यांनी वयाच्या ९२व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयातत्यांचं निधन झालं. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी ४ वाजता शिवाजी पार्क स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
सध्याआशा भोसले यांचे पार्थिव सोमवारी त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी अंत्यदर्शनसाठी ठेवण्यात आले होते. त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्यासाठी राजकीय, सामाजिक, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील अनेक दिग्गज मंडळी आली आहेत. Asha Bhosle
आशा भोसले यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्यासाठी उद्धव ठाकरे सहकुटुंब याठिकाणी आले होते. उद्धव ठाकरे यांनी आशा भोसले यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी रश्मी ठाकरे यांना अश्रु अनावर झाल्याचे पाहायला मिळाले. तर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे देखील भावूक झाले.
याशिवाय आशा भोसले यांच्या कुटुंबाचे जवळचे स्नेही असलेले माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर पत्नी अंजली तेंडुलकर यांच्यासह आशा ताईंचे अंतिम दर्शन घेण्यासाठी पोहोचले होता. यावेळी सचिनच्या डोळ्यातही अश्रु दिसले. आशा भोसले यांच्या कुटुंबाचे जवळचे स्नेही असलेले माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर हे पत्नी अंजली तेंडुलकर यांच्यासह आशा ताईंचे अंतिम दर्शन घेण्यासाठी पोहोचले आहेत. Asha Bhosle
ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख, गायिका अनुराधा पौडवाल, अभिनेता रितेश देशमुख यांनीही आशा भोसले यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. याशिवाय संगीत आणि चित्रपट क्षेत्रातील अनेक दिग्गज कलाकार आशा ताईंचे शेवटचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहेत. Asha Bhosle
हेही वाचा:






