Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; ‘या’ बड्या नेत्यानी सोडली साथ, शिवसेनेत करणार प्रवेश
Maharashtra Politics : रत्नागिरीतील युवासेना नेते उमेश खताते यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ते शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश करणार आहेत.

Maharashtra Politics : रत्नागिरी जिल्ह्यातून मोठी राजकीय घडामोड समोर आली असून कोकणातील राजकारण ढवळून निघाले आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना (ठाकरे गट) ला मोठा धक्का बसला आहे. युवासेनेचे आक्रमक आणि प्रभावी नेते उमेश खताते यांनी पक्षाला रामराम ठोकत शेकडो कार्यकर्त्यांसह साथ सोडली आहे. (Maharashtra Politics )
मिळालेल्या माहितीनुसार, खेर्डी परिसरात मजबूत संघटन उभारणारे खताते आज मुंबई येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात अधिकृत प्रवेश करणार आहेत. त्यांच्या या निर्णयामुळे रत्नागिरीत राजकीय वातावरण तापले असून ठाकरे गटाला मोठे खिंडार पडल्याची चर्चा रंगली आहे.
उमेश खताते हे युवासेनेचे माजी तालुकाप्रमुख असून त्यांनी स्थानिक पातळीवर पक्ष संघटना उभी करण्यासाठी मोठे योगदान दिले आहे. विविध स्थानिक प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेत त्यांनी सामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे त्यांचा स्थानिक पातळीवर चांगला जनसंपर्क आणि प्रभाव असल्याचे मानले जाते. Maharashtra Politics

Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; ‘या’ बड्या नेत्यानी सोडली साथ, शिवसेनेत करणार प्रवेश
त्यांच्या या पक्षांतरामुळे केवळ रत्नागिरीतच नव्हे, तर संपूर्ण कोकणात राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेषतः शेकडो कार्यकर्ते त्यांच्या सोबत शिंदे गटात प्रवेश करणार असल्याने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेची ताकद या भागात वाढण्याची शक्यता आहे.
दरम्यान, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या घडामोडी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जात असून, कोकणातील राजकीय चित्र बदलण्याची चिन्हे दिसत आहेत. ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का मानला जात असताना, शिंदे गटासाठी ही मोठी राजकीय ताकद वाढवणारी चाल ठरणार आहे. (Maharashtra Politics)




