भाजप नेते चंद्रकांत पाटील येताच वाजवलं राष्ट्रवादी पुन्हा.. गाणं; डीजेवाला पोलिसांच्या ताब्यात

पुणे – भाजपा नेते आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील एका कार्यक्रमस्थळी येताच तेथे उपस्थित असलेल्या डीजेवर राष्ट्रवादी काॅंग्रेसचं राष्ट्रवादी पुन्हा… हे प्रचार गीत वाजलं आणि एकच गोंधळ उडाला.
राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आज एका कार्यक्रमानिमित्त पुणे शहरातील रास्तापेठ येथे आले होते. यावेळी हा प्रकार घडला. दरम्यान पोलिसांनी त्या डीजे चालवणाऱ्याला ताब्यात घेतले आहे. डीजे लावण्यासाठी त्याने परवानगी घेतली नसल्याचे कारण देत त्याला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साऊंड सिस्टिम उभारण्यासाठी परवानगी न घेतल्याने त्याला त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
भाजप नेते चंद्रकांत पाटील येताच वाजवलं राष्ट्रवादी पुन्हा.. गाणं, डीजेवाला पोलिसांच्या ताब्यात pic.twitter.com/xL1Sf9VyWq
— Digital Prabhat (@Dainik_Prabhat) October 28, 2022
दरम्यान, चंद्रकांत पाटील कार्यक्रम स्थळी येताच डीजेवर राष्ट्रवादी पुन्हा.. हे गीत वाजल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या जोरदार व्हायरल होत आहे.





