school news : एका झटक्यात तब्बल ‘इतक्या’ सरकारी शाळा केल्या बंद; सरकारने का घेतला इतका मोठा निर्णय? पाहा….

Government school | Rajasthan School – राजस्थानच्या भजनलाल सरकारने गेल्या १० दिवसांत ४५० हिंदी माध्यमाच्या सरकारी शाळा बंद केल्या आहेत. ताज्या आदेशानुसार, माध्यमिक शिक्षण संचालक आशिष मोदी यांनी गुरुवारी रात्री उशिरा २६० शाळा बंद करण्याचा आदेश जारी केला. यापूर्वी, सुमारे १९० शाळा बंद करण्यात आल्या होत्या.
बिकानेरमध्ये, कोलायतचे भाजप आमदार अंशुमन सिंग भाटी यांच्या घरासमोरील सरकारी कन्या वरिष्ठ माध्यमिक शाळा देखील बंद करण्यात आली आहे. प्रशासनाने ही शाळा मुलांच्या शाळेमध्ये विलीन केली आहे. येथे कमी पटसंख्या असल्याने असा निर्णय घेतला गेला.
या शाळेत सुमारे ३०० मुली शिक्षण घेत होत्या. या निर्णयाबाबत परिसरातील लोकांनी आमदार अंशुमन सिंह आणि त्यांचे आजोबा माजी आमदार देवी सिंह भाटी यांच्याकडे नाराजी व्यक्त केली आहे.
राज्य सरकारने बंद केलेल्या २६० शाळांपैकी १४ उच्च माध्यमिक शाळा आहेत. त्यांची पटसंख्या कमी असल्याने, त्यांना जवळच्या शाळांमध्ये विलीन करण्यात आले आहे.
बंद करण्यात आलेल्या शाळांमध्ये जयपूर, अजमेर, पाली, बिकानेर, हनुमानगड, उदयपूर आणि जोधपूर येथील शाळा समाविष्ट आहेत. तसेच राजस्थानमधील २०० प्राथमिक आणि उच्च प्राथमिक शाळा शून्य पटसंख्येमुळे बंद करण्यात आल्या आहेत.
या शाळाही जवळच्या माध्यमिक आणि वरिष्ठ माध्यमिक शाळांमध्ये विलीन करण्यात आल्या आहेत. या शाळांमध्ये अजमेर, अलवर, बांसवाडा, बारान, बारमेर, भरतपूर, बिकानेर, जोधपूर, जयपूर, सिकर, उदयपूर या जिल्ह्यांतील शाळांचा समावेश आहे.
भजनलाल सरकारने इंग्रजी माध्यमाच्या महात्मा गांधी शाळांचा आढावा घेण्यासाठी मंत्र्यांची एक समिती स्थापन केली होती, परंतु आतापर्यंत या शाळा बंद करण्याची कोणतीही शिफारस करण्यात आलेली नाही.
परिणामी, एकही इंग्रजी माध्यमाची शाळा बंद झाली नाही, पण हिंदी माध्यमाच्या ४५० शाळा बंद केल्या गेल्या. राज्य सरकारच्या या निर्णयाबाबत पालक आणि स्थानिक नागरिकांमध्ये संताप आहे. अनेक भागात निषेधही नोंदवण्यात आले आहेत.





