Nagar | आमदार या नात्याने शहराच्या विकासाला प्राधान्य

नगर,(प्रतिनिधी) – शहरातील कापड बाजार या प्रमुख बाजारपेठेला मोठीं वैभवशाली परंपरा आहे. राज्यात नावाजलेली ही प्रमुख बाजारपेठ अधिक समृद्ध व्हावी यासाठी बाजारपेठेचे अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत. बाजार पेठेतील रस्त्याच्या कामाची मागणी मान्य झाली असून कापड बाजारातून जाणाऱ्या रस्त्याच्या कामास सुमारे १२ कोटी रुपये निधी उपलब्ध झाला आहे.
लवकरच माळीवाडा ते लालटाकी या रस्त्याचे काँक्रीटीकरणाच्या कामास सुरुवात होणार आहे. शहराच्या विकासात मोलाची भर घालण्यास गेल्या १० वर्षांपासून आमदार या नात्याने प्राधान्य देत आहे, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
विधानसभा निवडणुकीचे अहिल्यानगर शहर मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आ.संग्राम जगताप यांनी शुक्रवार (दि.२५) सकाळी अहिल्यानगर मधील कापड बाजार या मुख्य बाजारपेठेतून प्रचारफेरी काढून व्यापाऱ्यांच्या गाठीभेटी घेतल्या.
भिंगारवाला चौकातील जैन मंदिरात आ. जगताप यांनी भगवान महावीर स्वामींचे दर्शन घेऊन तसेच साध्वी ऋतुप्रज्ञा श्री जी यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी व्यापारी वर्ग या प्रचारीत मोठ्या संख्येने व्यापारी वर्ग सहभागी होत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
यावेळी कापड बाजार प्रचारफेरीत उमेदवार संग्राम जगताप यांचे प्रत्येक दुकानामध्ये व्यापारी वर्गाच्या वतीने उत्स्फूर्त स्वागत केले जात होते. ठीक ठिकाणी त्यांचा सत्कार तसेच अनेक ठिकाणी त्यांच्यावर पुष्पवृष्टी करून दुकानदारांनी स्वागत केले.
यावेळी कापड बाजार व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष शामराव देडगावकर, माजी नगरसेवक संजय चोपडा, माजी उपमहापौर गणेश भोसले, शिवसेनेचे शहर प्रमुख सचिन जाधव, माजी नगरसेविका मालन ढोणे, लतिका पवार, अंजली आढाव, रेश्मा आठरे, कमलेश भंडारी, मर्चंट बँकेचे संचालक अमित मुथा, राजेंद्र चोपडा राजेंद्र ताठेड, मनीष मुंदडा,
संजय ढोणे, राजेश भंडारी, संजय ताठेड, बाळासाहेब धाडीवाल, ज्ञानेश्वर रासकर, राजेंद्र बोथरा, अभय श्रीमाळ, रफिक चुडीवाल, डॉ.सचिन बोरा, डॉ.विजय भंडारी, मनीष फुलडहाळे, किशोर डागा, सुनील दुगड, अभय गुगळे, किरण पोखरण, पेमा शेठ पोखरण, मयूर पितळे, किरण डागा,
लकी खूपचंदानी, संभव काथेड, अनिल निकम, हबीब फर्निचरवाले, प्रकाश भागानगरे, अमोल निस्ताने, दीपक नवलानी, विपुल शेटीया, राजू शेटिया, राजीव छाजेड आदींसह मोठ्या संख्येने व्यापारी वर्ग प्रचारफेरीत उस्पर्तपणे सहभागी झाले होते. कोहिनूर या प्रसिद्ध व सदांना मध्ये मध्येही आमदार जगताप यांचे गांधी परिवाराच्या वतीने स्वागत करण्यात आले.





