Arya Sports T20 Cricket Tournament : स्टार इलेव्हनची विजयी सलामी…
Updated On:

पुणे – ज्येष्ठ नेते शरद पवार आणि अण्णासाहेब पठारे यांच्या वाढदिवसानिमित्त खराडी जिमखाना व आर्या स्पोर्टस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आर्या स्पोर्टस टी-२० क्रिकेट स्पर्धेत साखळी फेरीत स्टार इलेव्हन, किंग्ज स्पोर्टस या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघाचा पराभव करून विजयी सलामी दिली.
खराडी जिमखाना येथील क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत पियूश सोहनी (९६ धावा) याने केलेल्या धडाकेबाज फलंदाजीच्या जोरावर किंग्ज स्पोर्टस संघाने फायटर्स संघाचा ७० धावांनी पराभव करून शानदार सुरुवात केली.
Junior World Cup Malaysia 2023 : भारताचे विजेतेपदाचं स्वप्न भंगलं; उपांत्य फेरीत जर्मनीकडून पराभव…
दुसऱ्या सामन्यात विक्रम चौधरी (५७ धावा) याने केलेल्या सुरेख फलंदाजीच्या जोरावर स्टार इलेव्हन संघाने सनराईज इलेव्हन संघाचा ३९ धावांनी पराभव केला.





