Arvind Sawant : शिवसेना ठाकरे गटातील अंतर्गत हालचालींना पुन्हा वेग आला असून ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चेमुळे राजकीय वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर खासदार अरविंद सावंत यांना ‘मातोश्री’वर बोलावण्यात आले होते. त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेत महत्त्वाची चर्चा केली. यानंतर त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधला.
बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना सावंत यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर पूर्ण विश्वास असल्याचे स्पष्ट केले. तसेच खासदारांविषयी चुकीच्या बातम्या देणाऱ्या वृत्तपत्रांवर कायदेशीर कारवाई करणार असल्याचा इशाराही दिला. “जे घडलंच नाही ते दाखवून विकाऊ पत्रकारिता केली जात आहे,” असा गंभीर आरोप त्यांनी केला. संबंधित वृत्तपत्राला नोटीस पाठवणार असल्याचे त्यांनी सांगितले.
स्नेहभोजनावरून संताप (Arvind Sawant)
दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी शिंदे गटाचे केंद्रीय मंत्री प्रताराव जाधव यांच्या दिल्लीतील निवासस्थानी आयोजित स्नेहभोजनाला ठाकरे गटाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर संजय देशमुखउपस्थित राहिल्याने राजकीय चर्चांना उधाण आले होते.
Arvind Sawant : उद्धव ठाकरेंची भेट घेतल्यानंतर अरविंद सावंतांची प्रतिक्रिया; त्या गोष्टीची आठवण करुन देत स्पष्ट शब्दांत म्हणाले…
यावर प्रतिक्रिया देताना सावंत म्हणाले, “कोणी कुठं जावं हे प्रत्येकाने स्वतः ठरवावे. ज्यांनी उद्धव ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसला, त्यांच्या घरी जाऊन भोजन करायचे का, याचा प्रत्येकाने विचार करावा,” अशा शब्दांत त्यांनी नाराजी व्यक्त केली. Arvind Sawant
खासदारांमध्ये अस्वस्थता?
ठाकरे गटातील खासदारांमध्ये अस्वस्थता असल्याच्या चर्चांवर बोलताना सावंत म्हणाले की, निधी न मिळाल्यास बंड करण्याची भाषा चुकीची आहे. “आम्ही शिवसैनिक आहोत,” असेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.
दरम्यान, ठाकरे गटातील काही खासदार फुटणार असल्याच्या चर्चेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या सर्व घडामोडींमुळे पुढील काळात शिवसेनेत नेमके काय बदल होतात, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. Arvind Sawant