“…आता गप्प बसू शकत नाही” ; अरविंद केजरीवाल यांचे लडाखमधील हिंसाचारावर मोठे विधान

Arvind Kejriwal on Ladakh। दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे (आप) राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी लेह, लडाख याठिकाणी झालेल्या हिंसक निदर्शनांवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. केजरीवाल यांनी, “आज लडाखमध्ये जे घडत आहे ते अत्यंत चिंताजनक आहे. प्रत्येक खऱ्या देशभक्ताने लडाखच्या लोकांना पाठिंबा दिला पाहिजे.” असे आवाहन यावेळी केले आहे.
अरविंद केजरीवाल यांनी यावेळी बोलताना,”आपण ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळवले का जेणेकरून लोक ब्रिटिशांऐवजी भाजपचे गुलाम व्हावेत? भगतसिंग आणि चंद्रशेखर आझाद सारख्या क्रांतिकारकांनी लोकशाहीसाठी आपले प्राण दिले जेणेकरून प्रत्येक भारतीयाला स्वतःचे सरकार निवडण्याचा अधिकार मिळेल.” असे म्हटले. तसेच पुढे त्यांनी, “पण आज सत्तेच्या नशेत, भाजप एकामागून एक राज्यांचे केंद्रशासित प्रदेशात रूपांतर करत आहे, संविधानाने दिलेले अधिकार हिसकावून घेत आहे.” असा आरोप देखील त्यांनी यावेळी केला.
…उद्या हा संपूर्ण देशासाठी लढा बनू शकतो Arvind Kejriwal on Ladakh।
केजरीवाल यांनी लडाखच्या हिंसक आंदोलनाविषयी बोलताना,”लडाखचे लोक काय मागत आहेत? ते फक्त त्यांचा मतदानाचा अधिकार आणि सरकार निवडण्याचा अधिकार मागत आहेत. पण भाजप त्यांचा आवाज दाबत आहे.” वारंवार आश्वासने देऊनही त्यांना मतदानाचा अधिकार दिला जात नाही.” असे म्हणत त्यांनी केन्डर सरकारवर निशाणा साधला आहे.
त्यासोबतच त्यांनी,”लोकशाही हा जनतेचा आवाज आहे. आणि जेव्हा सरकार तो आवाज दाबू लागते, तेव्हा मोठ्याने बोलणे हे जनतेचे कर्तव्य आहे. जर आपल्याला देशाची लोकशाही वाचवायची असेल, तर आपण या हुकूमशाहीविरुद्ध गप्प बसू शकत नाही. आज, लडाखचा लढा उद्या संपूर्ण देशाचा लढा बनू शकतो.”असे त्यांनी म्हटले.
कालपासून लडाखला राज्याचा दर्जा मिळावा यासाठी झालेल्या निदर्शनादरम्यान हिंसाचार झाला. त्यात चार जणांचा मृत्यू झाला आणि ८० हून अधिक जण जखमी झाले. त्यानंतर प्रशासनाने लडाखमध्ये कर्फ्यू लागू केला, ज्यामध्ये ५० जणांना ताब्यात घेण्यात आले. हिंसक घटनांनंतर, हवामान कार्यकर्त्या सोनम वांगचुक यांनी त्यांचे उपोषण संपवण्याची घोषणा केली. ते राज्याच्या मागणीसाठी १५ दिवसांपासून उपोषण करत होते. Arvind Kejriwal on Ladakh।





