‘अरुंधती’ पुन्हा एकदा येणार प्रेक्षकांच्या भेटीस; ‘या’ मालिकेत होणार एन्ट्री

Arundhati Deshmukh Back | स्टार प्रवाहवरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतील ‘अरुंधती’ या पात्राला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. या मालिकेत ‘अरुंधती’ची महत्त्वाची भूमिका मधुराणी गोखले हिने साकारली होती. या मालिकेद्वारे ती घराघरात पोहचली. काही दिवसांपूर्वीच या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. यानंतर आता मधुराणी गोखले एका नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत’ मालिकेत सध्या स्वीटी आणि मकरंदच्या लग्नाची धामधूम सुरु आहे. या दोघांच्या लग्नात अरुंधती खास हजेरी लावणार आहे. ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत’ मालिकेच्या सेटवरील मधुराणीचे फोटो व्हायरल झाले आहेत. या फोटोत मधुराणी मालिकेतील आईसोबत अर्थात निवेदिता सराफ यांच्यासोबत गप्पा मारताना दिसते. पुन्हा एकदा मधूराणीला काम करताना पाहून चाहत्यांनी देखील आनंद व्यक्त केला आहे. Arundhati Deshmukh Back |
View this post on Instagram
अभिनेत्री मधुराणीने देखील पुन्हा एकदा अरुंधती साकारायला मिळतेय याचा अतिशय आनंद होत असल्याचे म्हंटले आहे. प्रेक्षकांप्रमाणेच मी देखील अरुंधतीला खूप मिस करत होते. सेटवरची लगबग, हातातली स्क्रिप्ट, कॅमेरा या सगळ्या गोष्टी खूप दिवसांनंतर अनुभवायला मिळत आहेत. आता नव्या टीमसोबत काम करताना खूप छान वाटत असल्याचेही तिने म्हंटले आहे. Arundhati Deshmukh Back |
‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत’ या मालिकेबद्दल बोलायचे झाले तर, अभिनेत्री निवेदिता सराफ आणि मंगेश कदम हे प्रमुख भूमिकेत पाहायला मिळत आहेत. या मालिकेत हरीश दुधाडे, अपूर्वा परांजपे, किआरा मंडलिक, प्रतिक्षा जाधव, आदिश वैद्य, पालवी कदम यांच्या प्रमुख भूमिका आहेत. Arundhati Deshmukh Back |
हेही वाचा:
Budget 2025: अर्थसंकल्पातून सर्वसामान्यांना दिलासा मिळणार? काय स्वस्त आणि काय महाग होणार?





