BMC Election 2026 | आगामी महापालिका निवडणुकांसाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. याशिवाय ठाकरे बंधुच्या युतीच्या घोषणेनंतर राजकारणात एक नवा ट्वीस्ट पाहायला मिळणार आहे. यातच आता महापालिका निवडणुकीत मुंबईचा डॉन अरुण गवळी यांच्या कन्या गीता गवळी आणि योगिता गवळी निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत. दोघींनीही अखिल भारतीय सेनेच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. योगिता गवळी पहिल्यांदाच निवडणूक रिंगणात गीता गवळी यांनी प्रभाग क्रमांक 212 मधून तर योगिता गवळी यांनी प्रभाग क्रमांक 207 मधून आपले नामनिर्देशन दाखल केले आहे. गीता गवळी या माजी नगरसेवक असून त्या यापूर्वी सलग निवडून आल्या आहेत. दुसरीकडे, योगिता गवळी या पहिल्यांदाच निवडणूक रिंगणात उतरल्या असून, त्यांच्यासाठी ही निवडणूक राजकीय पदार्पण ठरणार आहे. काही महिन्यांपूर्वी अखिल भारतीय सेनेच्या आणि अरूण गवळीच्या भावजई वंदना गवळी यांनी शिंदे सेनेत प्रवेश केला होता. त्यामुळे ती जागा आता अरुण गवळींची मुलगी योगिता लढणार आहे. योगिता गवळी हिने काकी वंदना गवळी यांच्या विरोधात 207 मधून अर्ज भरला आहे. BMC Election 2026 | १८ वर्षानंतर अरुण गवळी जामीन मंजूर मुंबईत २००७ मध्ये शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांची घाटकोपर येथे त्यांच्या निवासस्थानी भरदिवसा हत्या करण्यात आली होती. या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला कुख्यात गुंड डॅडी उर्फ अरुण गवळी तुरुंगाबाहेर आला आहे. या प्रकरणात १८ वर्षानंतर अरुण गवळी याला जामीन मंजूर करण्यात आला आहे. BMC Election 2026 | हेही वाचा: जपानच्या एक्सप्रेसवेवर भीषण अपघात ; ५० हून अधिक वाहनांची एकमेकांना धडक