‘कल्की 2898 एडी’बाबत अर्शदने व्यक्त केली नाराजी; प्रभासला म्हटले ‘जोकर’

Arshad Warsi | अभिनेता प्रभासच्या ‘कल्की 2898 एडी’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळला. मात्र अर्शदने प्रभासच्या ‘कल्कि 2898एडी’बाबत एका मुलाखतीत जाहीररित्या नाराजी व्यक्त केली आहे. प्रभास या सिनेमात जोकर वाटल्याचे विधान त्याने यावेळी केले आहे. यामुळे प्रभासचे चाहते अर्शदवर टीका करत आहे. तर काही जण त्याला पाठिंबा देत आहेत.
अर्शदने समदीश भाटियाच्या मुलाखतीत म्हंटले की, “मला हा सिनेमा आवडला नाही. पण अमिताभ बच्चन हे सिनेमात किती कमाल दिसतात. त्यांच्यासारखी थोडी एनर्जी आपल्याला मिळाली तर आपलीही लाईफ सेट होईल. पण यात प्रभासला जोकर बनवण्यात आले आहे.
मला मॅड मॅक्स सिनेमासारखं काहीतरी बघायला मिळेल याची अपेक्षा होती. मी तिथे मेल गिब्सनसारख्या कलाकाराला इमॅजिन करतोय. पण प्रभासने काहीतरी वेगळंच केलं. तो असं का करतो, मला खरंच कळत नाही.” या विधानानंतर प्रभासच्या चाहत्यांनी त्याला ट्रोल केले आहे. तसेच काहींनी प्रभासची माफी मागण्यासही सांगितले आहे.
कल्की 2898 एडी 27 जून रोजी रिलीज झाला. जागतिक स्तरावर 1000 कोटी रुपयांपेक्षा जास्त गल्ला या चित्रपटाने केला आहे. या चित्रपटात दीपिका पदुकोण, कमल हासन, दिशा पटानी प्रमुख भूमिकेत आहेत.
अर्शदच्या कामबद्दल बोलायचे झाले तर, त्याने ‘जानी दुश्मन: एक अनोखी कहानी’, ‘लगे रहो मुन्नाभाई’, ‘गोलमाल’, ‘धमाल’ यासारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अर्शद वारसी ‘बच्चन पांडे’ चित्रपटात अखेरचा दिसला होता. आता तो लवकरच ‘जॉली ‘LLB3’ मध्ये दिसणार आहे.
हेही वाचा:
विधानसभेसाठी काँग्रेस सज्ज ; 38 आमदारांना सीटिंग गेटिंग फॉर्मुल्यानुसार तयारी करण्याच्या सूचना





