विधानसभेसाठी काँग्रेस सज्ज ; 38 आमदारांना सीटिंग गेटिंग फॉर्मुल्यानुसार तयारी करण्याच्या सूचना

Congress on Vidhan Sabha Election । राज्यात सध्या विधानसभा निवडणुकांचे वारे सध्या वाहू लागलेत. मात्र दुसरीकडे विधानसभेची घोषणा करण्यात आली नाही. परंतु, या निवडणुकांसाठी सर्वपक्षाने जय्यत तयारी सुरु केली आहे. त्यातच नागपूर शहरातील सहा हि विधानसभा मतदारसंघावर काही दिवसांपूर्वी काँग्रेसने दावा केला होता. आता त्याच पार्श्वभूमीवर या सर्व मतदारसंघात निवडणूक पूर्व तयारीलाही सुरवात झाली आहे. याविषयी माहिती काँग्रेसचे शहर अध्यक्ष व आमदार विकास ठाकरे यांनी सांगितले होते.
38 आमदारांना सीटिंग गेटिंग फॉर्मुल्याच्या सूचना Congress on Vidhan Sabha Election ।
विधानसभेच्या तयारीसाठी काँग्रेसने आपल्या सीटिंग आमदारांना तयारीला लागण्याच्या सूचना दिल्या आहे. त्यानुसार मतदारसंघात ब्लॉक अध्यक्ष आणि बूथ प्रमुखांच्या बैठक, जेष्ठ कार्यकर्त्यांचे सत्कार, मेळावे सुरु झाले आहेत. तर दुसरीकडे काँग्रेसच्या दोन आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय, चार आमदार लोकसभेचे खासदार झाले तर एका आमदारांचे निधन झाले. त्यामुळे सध्या काँग्रेसच्या 38 आमदारांनी सीटिंग गेटिंग फॉर्मुल्यानुसार तयारी सुरु केली. उत्तर नागपूर या विधानसभा मतदार संघात नितीन राऊत हे आमदार आहे. त्यांनी देखील जोरदार निवडणूक पूर्व कॅम्पेन सुरू केल्याचे बघायला मिळाले आहे. त्यामुळे राज्याची उपराजधानी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शहरात काँग्रेसने जोरदार मोर्चे बांधणी केल्याचे चित्र आहे.
फडणवीसांविरोधात लढवण्यासाठी इच्छुकांची स्पर्धा Congress on Vidhan Sabha Election ।
नागपूर शहरातील सहा हि विधानसभा मतदारसंघावर आतापर्यंत 71 इच्छुक उमेदवारांनी शहर काँग्रेसकडे उमेदवारी मिळावी, यासाठी अर्ज केले आहे. यात सर्वाधिक अर्ज हे मध्य नागपूर विधानसभेसाठी 30 अर्ज आले असल्याचे विकास ठाकरे यांनी सांगितले. देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात लढण्यासाठी देखील काँग्रेस मध्ये इच्छुकांची मोठी यादी असल्याचे ही विकास ठाकरे म्हणाले. गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसपक्षाने उसंत घेत घवघवीत यश मिळवले होते. तर राज्यासह विदर्भात काँग्रेस पक्ष हा सर्वात मोठा पक्ष ठरला होता. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीतही काँग्रेस मोठ्या मताधिक्याने सर्वच्या सर्व जागांवर विजय संपादन करेल, असा विश्वासही आमदार विकास ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला.





