‘बाळूमामा’ यांचा अवतार असल्याचे सांगुन फसवणुक करणारे जेरबंद

पुणे – ‘बाळूमामा’ यांचा अवतार असल्याचा बहाणा करुन गंभीर आजार झाडपाल्याचे औषधाने बरा करताे असे सांगुन लाखाे रुपयांची आर्थिक फसवणुक केल्याप्रकरणी भाेंदुबाबावर बारामती पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनाेहर मामा भाेसले (रा.उंदरगाव, ता.करमाळा,साेलापूर) असे गुन्हा दाखल झालेल्या आराेपीचे नाव आहे.
याप्रकरणी २३ वर्षिय तरुणाने पाेलीसांकडे तक्रार दाखल केली आहे. तक्रारदार तरुणाचे वडील यांना गळयातील थायराईड कॅन्सरचा अजाचार असून सदर आजार बरा करताे असे मनाेहर भाेसले यांनी सांगितले.
बाळूमामा यांचा अवतार असल्याचे सांगत त्यांनी तक्रारदार यांचे वडीलांना बाभळीचा पाला, साखर भंडारा खाण्यास देऊन विशाल वाघमारे या सहकाऱ्यासह संगनमत करुन वेळाेवेळी दाेन लाख ५१ हजार रुपये घेतले. मात्र, त्यानंतरही तक्रारदार यांचे वडीलांचा आजार बरा न झाल्याने त्यांनी संबंधित लाेकांकडे पैशांची मागणी केली. परंतु त्यांना पैसे परत न देता आराेपींनी त्यांना थेट जीवे ठार मारण्याची धमकी दिली. त्यामुळे तक्रारदार यांनी याबाबत बारामती पाेलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. याप्रकरणी पुढील तपास बारामती पाेलीस करत आहे.





