गोळीबार करून लुटणाऱ्यांना अटक
Updated On:

पुणे – कंपनीत गोळीबार करत व्यावसायिकाला लुटणाऱ्या दोघांना गुन्हे शाखा युनिट-1 च्या पथकाने अटक केली. त्यांना लोणीकाळभोर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
स्वप्नील साठे (19) आणि अक्षय काकडे (21, दोघेही रा. शिवणे, पुणे) असे आरोपींची नावे आहेत. या घटनेचा समांतर तपास दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक करत होते. दोन आरोपी शिवणे येणार असल्याची माहिती पोलीस अंमलदार मॅगी जाधव व धनंजय ताजणे यांना मिळाली. त्यानुसार सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले.





