स्वातंत्र्य दिनापूर्वीच जम्मू-काश्मीरच्या डोडामध्ये लष्कराचे कॅप्टन शहीद; तर 4 दहशतवाद्यांचा खात्मा

Encounter in Doda | देशात स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. मात्र असे असतानाच जम्मू-काश्मीरमधील डोडा येथे झालेल्या चकमकीत भारतीय सैन्याचे कॅप्टन शहिद झाल्याची दु:खद बातमी समोर आली आहे. तर या चकमकीत 4 दहशतवादीही मारले गेल्याचे आहे. कॅप्टन दीपक सिंह आपल्या पथकाच्या नेतृत्वात या दहशतवाद्यांशी लढत असताना दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात त्यांना वीरमरण आले.
चकमकीत गोळी लागल्यानंतर कॅप्टन दीपक यांना त्यांच्या पथकाने रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. डोडा येथील पटनीटॉपच्या जंगलात काल संध्याकाळपासून सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. दरम्यान, दहशतवादी शस्त्रे सोडून पळून गेल्याचे लष्कराने सांगितले. लपून बसलेल्या ठिकाणाहून अमेरिकन एम 4 रायफल जप्त करण्यात आली आहे. तीन बॅगमध्ये काही स्फोटकेही सापडली आहेत.
दरम्यान, हे दहशतवादी एका नदीजवळ लपून बसल्याची खबर लष्कराला मिळाली. यानंतर भारतीय जवानांनी तिथे हल्ला केला, तिथे दहशतवाद्यांनी स्वत:ला घेरलेले पाहून गोळ्या झाडायला सुरुवात केली. या गोळीबारात दीपक यांना वीरमरण आले. Encounter in Doda |
सातत्याने चकमक सुरू
गेल्या पाच दिवसांतील ही चौथी चकमक आहे. यापूर्वी 11 ऑगस्ट रोजी किश्तवाड जिल्ह्यातील जंगलात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये गोळीबार झाला होता. त्याच दिवशी उधमपूरच्या बसंतगडच्या जंगलात लष्कर आणि सुरक्षा दलांमध्ये गोळीबार झाला होता. 10 ऑगस्ट रोजी कोकरनाग, अनंतनाग येथे दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात हवालदार दीपक कुमार यादव आणि लान्स नाईक प्रवीण शर्मा शहीद झाले होते. 3 सैनिक आणि 2 नागरिक जखमी झाले. Encounter in Doda |
गुप्तचर यंत्रणांना अलर्ट राहण्याचे आदेश
दरम्यान, स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राजधानी दिल्ली दहशवाद्यांच्या घटनांवरुन बैठका सुरू असून गुप्तचर यंत्रणांना अलर्ट राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच बांगलादेशातील हिंसाचारानंतर अनेक बांगलादेशी नागरिक भारताच्या हद्दीत येण्याचा प्रयत्न करत आहेत. या पार्श्वभूमीवर भारताच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त दिल्लीत हायअलर्ट जाहीर करण्यात आला आहे. Encounter in Doda |
हेही वाचा:





