Jammu and Kashmir accident : बसवरील नियंत्रण सुटल्याने २० यात्रेकरूंचा अंत; पंतप्रधान मोदींकडून मृतांच्या वारसांना मदत जाहीर
Jammu and Kashmir accident : मृतांच्या कुटुंबीयांना 2 लाख रुपये आणि जखमींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर

Jammu and Kashmir accident : जम्मू-काश्मीरमधील उधमपूर जिल्ह्यात यात्रेकरुंच्या बसचा भीषण अपघात झाला. रामनगरजवळील कनोते गावाजवळून बस जात असताना हा अपघात झाला. या दुर्घटनेत बसमधील 20 यात्रेकरु ठार झाले असून 30 प्रवासी जखमी झाल्याची माहिती आहे. (Jammu and Kashmir accident)
मिळालेल्या माहितीनुसार, उंचावरील डोंगराळ रस्त्यावरून जात असताना एका वळणावर चालकाचं बसवरील नियंत्रण सुटलं आणि बस थेट दरीत कोसळली. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत मदत आणि बचाव कार्य सुरू केले. या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दु:ख व्यक्त करत मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत जाहीर केली आहे. (Jammu and Kashmir accident)
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उधमपूर अपघाताच्या घटनेवर शोक व्यक्त केला. ”या दुर्घटनेत लोकांचा मृत्यू झाल्याची बातमी अत्यंत दुःखद आहे. मृतांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त करतो, अपघातामधील जखमी लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना. पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून (PMNRF) मृतांच्या कुटुंबीयांना 2 लाख रुपये आणि जखमींना 50 हजार रुपयांची मदत देण्यात येईल, असे ट्विट पंतप्रधान मोदींनी केले आहे. Jammu and Kashmir accident
Pained to hear about the loss of lives due to a bus accident in Udhampur, Jammu and Kashmir. I extend my heartfelt condolences to those who have lost their near and dear ones. I pray for the speedy recovery of the injured.
An ex gratia of Rs. 2 lakh from PMNRF would be given to…
— PMO India (@PMOIndia) April 20, 2026

Jammu and Kashmir accident : बसवरील नियंत्रण सुटल्याने २० यात्रेकरूंचा अंत; पंतप्रधान मोदींकडून मृतांच्या वारसांना मदत जाहीर
तर काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनीही अपघाताच्या घटनेवर शोक व्यक्त करत मृतांना श्रद्धांजली वाहिली. उधमपूर बस दरीत कोसळल्याने अनेक प्रवाशांचा मृत्यू झाल्याची बातमी अत्यंत दुःखद आहे. मृतात्म्यांना शांती मिळावी यासाठी प्रार्थना, शोकग्रस्त कुटुंबांप्रती संवेदना व्यक्त करतो. तसेच जखमी लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना,” असे ट्विट प्रियंका गांधी यांनी केले. (Jammu and Kashmir accident)
अपघातानंतर केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनीही या घटनेबाबत ‘एक्स’ वर पोस्ट केली. “मी उधमपूरचे डेप्युटी कमिशनर मिंगा शेरपा यांच्याशी चर्चा केली आहे. त्यांनी माहिती दिली की बचावकार्य वेळेत सुरू करण्यात आले असून जखमींना योग्य उपचार दिले जात आहेत. या घटनेची माहिती मिळताच मी तातडीने प्रशासनाशी संपर्क साधला. गंभीर जखमींना उपचारासाठी ‘एअरलिफ्ट’ (विमानाने नेणे) केलं जाऊ शकते, जेणेकरून त्यांना जम्मू-काश्मीरबाहेरील मोठ्या रुग्णालयांमध्ये उपचार मिळतील”, असे जितेंद्र सिंह यांनी सांगितले. Jammu and Kashmir accident
हेही वाचा:
Post Pregnancy Care: बाळासोबत आईचीही काळजी घ्या! डिलिव्हरीनंतरचे ६ आठवडे आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे





