Brij Bhushan Sharan Singh | बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराच्या प्रकरणी विविध राजकीय प्रतिक्रिया समोर येत आहेत. बांगलादेशातील परिस्थिती अद्याप नियंत्रणाबाहेर आहे. जमावाकडून देशात अनेक हिंदू समुदायावर हल्ले करण्यात येत आहेत. दरम्यान, बांगलादेशमध्ये अल्पसंख्याकांना, विशेषत: हिंदूंना सातत्यानं लक्ष्य केलं जात आहे, याबाबत भाजप नेते ब्रिजभूषण शरण सिंह यांनी चिंता व्यक्त केली आहे. यावरून त्यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर देखील निशाणा साधला आहे.
ब्रिजभूषण सिंह यांनी म्हटले आहे की, “बांगलादेशमध्ये अत्यंत दुःखद परिस्थिती आहे. हे सर्व भारतच्या शेजारी घडत आहे. बांगलादेशात जे काही घडले आणि होत आहे, त्याचा आपण कितीही निषेध केला तरी शब्द कमी आहेत. पाकिस्तान आणि बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार होत आहेत, हे खेदजनक आहे. देशातील मोठे नेते यावर बोलत नाहीत. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी एकही ट्विट केले नाही. ही देशाची जबाबदारी जेवढी मोदी आणि भाजपची आहे, तेवढीच विरोधकांचीही आहे.”
कोलकाता येथील प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्या प्रकरणावरही ब्रिजभूषण शरण सिंह भाष्य केले आहे. “बंगालमध्ये डॉक्टर सुरक्षित नाहीत. बांगलादेशच्या बाजूला कोलकाता आहे. त्यामुळं देश सुरक्षित राहिला तर राहुल गांधीही सुरक्षित राहतील,” असं ब्रिजभूषण शरण सिंह यांनी सांगितलं.
हिंदू समुदाय आणि बांगलादेश लष्कर यांच्यात संघर्ष
5 ऑगस्ट रोजी वाढत्या निषेधादरम्यान शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यानंतर आणि भारतात आल्यावर बांगलादेश अस्थिर राजकीय परिस्थितीतून जात आहे. मंगळवारी (13 ऑगस्ट 2024) अल्पसंख्याक हिंदू समुदायाचे लोक आणि बांगलादेशी लष्कराचे सैनिक यांच्यात चकमक झाली, जे देशातील हिंसाचारात बेपत्ता झालेल्या त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या पोस्टर्ससह निषेध करत होते. बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस राहत असलेल्या ढाका येथील जमुना स्टेट गेस्ट हाऊसबाहेर हे सर्व हिंदू निदर्शने करत होते.
हेही वाचा:
… अन् सुरज म्हणाला,’ट्रॉफी तर मीच नेणार..यांना कुणाला हाथ लावू देणार नाही’