Jammu and Kashmir – इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्या हत्येनंतर काश्मीरमध्ये उसळलेल्या संताप आणि आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर चौथ्या दिवशीही प्रशासनाने कडक खबरदारीचे उपाय कायम ठेवले आहेत. संभाव्य अशांतता रोखण्यासाठी काश्मीर खोऱ्यातील अनेक संवेदनशील भागांमध्ये निर्बंध लागू ठेवण्यात आले आहेत. प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी शिक्षण संस्थांनाही बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व सरकारी आणि खासगी शाळा, महाविद्यालये तसेच विद्यापीठे किमान शनिवार ७ मार्चपर्यंत बंद राहणार आहेत. काश्मीर विद्यापीठ आणि मध्यवर्ती विद्यापीठ यांसारख्या प्रमुख शैक्षणिक संस्थांनीही सर्व वर्ग स्थगित केले असून नियोजित परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. Jammu and Kashmir अफवा आणि चुकीची माहिती पसरू नये यासाठी इंटरनेट सेवांवरही निर्बंध लावण्यात आले आहेत. हाय-स्पीड मोबाईल डेटा सेवा (४जी/५जी) बंद करण्यात आले असून पोस्टपेड कनेक्शनसाठी इंटरनेटचा वेग 2जी पर्यंत मर्यादित ठेवण्यात आला आहे. Jammu and Kashmir US-Israel-Iran War विशेषतः श्रीनगरमधील काही जुन्या शहरात हा निर्णय लागू करण्यात आला आहे. श्रीनगरमधील मध्यवर्ती भाग लाल चौक येथे असलेले ऐतिहासिक घंटा घर परिसर पूर्णपणे सील करण्यात आला आहे. येथील पादचारी आणि वाहनांची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. Jammu and Kashmir इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्या मृत्यूनंतर काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणावर संताप आणि निदर्शने पाहायला मिळाली. हजारो लोक श्रीनगरमधील ऐतिहासिक घंटाघर परिसरात जमले आणि या हत्येचा तीव्र निषेध व्यक्त केला. Jammu and Kashmir सोमवारी संयुक्त राष्ट्रांच्या कार्यालयात एक निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात अमेरिकेचे आणि इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष यांच्यावर हत्या प्रकरण दाखल करण्याची मागणी करण्यात आली.