Arjun Tendulkar : गोवा संघातून अर्जुनचा पत्ता कट
Updated On:

मडगाव :- मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरला गेल्या आयपीएल मोसमात मुंबई इंडियन्सकडून खेळण्याची संधी मिळाली होती. त्याने आपल्या डावखुऱ्या वेगवान गोलंदाजीने प्रभावित देखील केले. मात्र त्यानंतर त्याचे नाव कुठेही चर्चेत आले नाही.
अर्जुन दक्षिण विभागाकडून देवधर ट्रॉफीमध्ये खेळताना दिसणार आहे. मात्र ज्या गोवा संघाकडून तो गेल्या रणजी मोसमात खेळला होता, त्याच गोवा संघाने आगामी मोसमासाठी जाहीर केलेल्या रणजी संभाव्य खेळाडूंच्या यादीतून त्याला डच्चू दिला आहे.
त्यामुळे अर्जुन आता गोवा संघापासून दूर होणार असून अन्य कोणत्यातरी संघाकडून खेळताना दिसणार आहे.





