अर्जुन कपूरची बहीण अंशुलाचे फोटो व्हायरल ! नवा बोल्ड लूक पाहून चाहत्यांनाही बसेना विश्वास

मुंबई – अर्जुन कपूरची लाडकी बहीण अंशुला भलेही चित्रपटांपासून दूर असेल, पण ती अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. अंशुला काही महिन्यांपूर्वी रोहन ठक्करला डेट केल्यामुळे चर्चेत आली होती. आता ती चक्क वजन कमी केल्यामुळे चर्चेत आली आहे. यापूर्वी ती अनेकदा फॅट असल्यामुळे ट्रोल झाली होती. मात्र आता अंशुलाचा सध्याचा लूक पाहून तुम्हालाही जबर झटका लागेल.
अंशुलाने बरेच वजन कमी केले आहे त्यामुळे अंशुला पुन्हा एकदा चर्चेत आली आहे, तिचे नव्या लूकमधील फोटो सध्या इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.अंशुला इन्स्टाग्रामवर बरीच सक्रिय आहे. तिचे फॅनफॉलोविंग देखील प्रचंड आहे. अंशुलाने नुकतेच शेअर केलेले फोटो पाहून चाहत्यांना धक्काच बसला. नव्या फोटोजमध्ये अंशुला एकदम स्लिम ट्रिम लूकमध्ये दिसत आहे.
या फोटोंमध्ये तिची बोल्ड स्टाइल पाहायला मिळत आहे. फोटोमध्ये अंशुलाने डीप नेक ऑफ शोल्डर मरून रंगाचा शॉर्ट ड्रेस घातला आहे.तिचा फिटनेस पाहून अनेकजण घायाळ झाले आहेत. तिचे कुरळे केस तिचा बोल्डनेस आणखी वाढवत आहे. सोशल मीडियावर अनेकांनी अंशुलाच्या फिटनेसचे कौतुक केले आहे. तर अनेकांनी तिला किती किलो वजन कमी केलं असा सवाल विचारला आहे.

अर्जुन कपूरची धाकटी बहीण अंशुला कपूर हिने हृतिक रोशनच्या HRX आणि Google India या ब्रँडसोबत काम केले आहे. समोर आलेल्या माहितीनुसार अंशुला व्यवसायाने लेखिका आहे आणि आता ती तिच्या वडिलांसोबत तिचे प्रोडक्शन हाऊस सांभाळते.





