ब्रेकअपनंतर पहिल्यांदाच मलायका आणि अर्जुन कपूर दिसले एकत्र

Malaika Arora and Arjun Kapoor |अभिनेत्री मलायका अरोरा आणि अभिनेता अर्जुन कपूर ब्रेकअपनंतर पहिल्यांदाच एकत्र आले आहेत. ‘होमबाउंड’ चित्रपटाच्या स्क्रीनिंगला अर्जुन आणि मलायका एकत्र आले होते. सध्या या दोघांचा व्हिडिओ सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे.
व्हिडिओमध्ये दिसतं की, मलायका आणि अर्जुन अचानक एकमेकांसमोर आले. दोघांनी एकमेकांना मिठी मारली. पुढे अर्जुनने मलायकाशी बोलण्याचा प्रयत्न केला. पण ती त्याला टाळायचा प्रयत्न करत होती. त्यानंतर मलायका मागे जाऊन नेहा धुपियाशी बोलण्यात मग्न होते. मात्र सोशल मीडिया युजर्सना ब्रेकअपनंतरही एक्स कपलमध्ये अशा प्रकारचे आदरयुक्त वर्तन पाहून त्यांचे कौतुक केले आहे. Malaika Arora and Arjun Kapoor |
View this post on Instagram
मलायका आणि अर्जुन यांनी 2018 मध्ये डेटिंग सुरू केली होती. सुरुवातीला या जोडप्याने त्यांच्या नात्याबद्दल फारसे काही सांगितले नाही. पण ते नियमितपणे त्यांच्या सुट्ट्यांचे रोमँटिक फोटो पोस्ट करत असत आणि एकमेकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असत. अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा जवळपास ६ वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते.
गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये अर्जुनने मलायकासोबतच्या नात्यावर आपले मौन तोडले होते. मुंबईतील एका इव्हेंटमध्ये जेव्हा लोकांनी अर्जुनशी बोलताना वारंवार मलायकाचे नाव घेतले, तेव्हा अर्जुन ‘मी सध्या सिंगल आहे. रिलॅक्स करा,’ असे सांगितले होते. यानंतर आता दोघे पहिल्यांदाच एकत्र दिसले आहे. Malaika Arora and Arjun Kapoor |
हेही वाचा:
‘सध्याच्या राजकारणातील कोहिनूर’; मनसेकडून ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकरांच्या कार्याचे कौतुक





