Janhvi Kapoor: “…मी माझ्या भावासोबत घडताना पाहिलं”; अर्जुन कपूरच्या ट्रोलिंगवर जान्हवीची प्रतिक्रिया
अर्जुन अनेकदा त्याच्या फ्लॉप करिअरमुळे आणि खासगी आयुष्यामुळे ट्रोल केलं जातं. यावर अर्जुन कपूरची सावत्र बहीण जान्हवी कपूरने (Janhvi Kapoor) प्रतिक्रिया दिली आहे.

Janhvi Kapoor: बॉलीवूड कलाकरांना अनेकदा सोशल मीडियावर ट्रोल केले जाते. यात अभिनेता अर्जुन कपूरचा देखील समावेश आहे. अर्जुन अनेकदा त्याच्या फ्लॉप करिअरमुळे आणि खासगी आयुष्यामुळे ट्रोल केलं जातं. यावर अर्जुन कपूरची सावत्र बहीण जान्हवी कपूरने प्रतिक्रिया दिली आहे.
एका मुलाखतीदरम्यान जान्हवी म्हणाली, “मी जितकं सोशल मीडिया कल्चरला समजून घेतलं, त्यानुसार मला असं वाटतं की प्रत्येकाला व्ह्यूज हवे असतात, व्हायरल व्हायचं असतं. स्वत:चं अस्तित्व टिकवून ठेवायचं असतं. त्यामुळे जर ते तुमच्याबद्दल कंटेंट बनवत असतील तर तुम्ही फक्त बळीचा बकरा आहात. Janhvi Kapoor:
ते तुमच्या नावाचा वापर क्लिकबेट आणि अशा गोष्टींसाठी करत आहेत, ज्याने त्यांना फक्त एंगेजमेंट मिळेल. कोणत्याही गोष्टींची पडताळणी न करता तुमचं नाव क्लिकबेइटसाठी वापरत आहेत. हे एखाद्याला टार्गेट करण्यासारखं आहे, जिथे सत्यापेक्षा सनसनाटीला जास्त महत्त्व दिलं जातं.” Janhvi Kapoor
पण जेव्हा तुम्हाला चुकीचं समजलं जातं आणि हे सर्व शोषण, बुलिंग अशा गोष्टींमध्ये बदलतं, तेव्हा वाईट वाटतं, दु:ख होतं. हे सर्व मी माझ्या भावासोबत घडताना पाहिलं आहे. अशा पद्धतीच्या वागणुकीसाठी कोणतंही निमित्त नसतं. त्यामुळे अशा गोष्टींमध्ये किती अडकायचं हे वेळीच कळणं गरजेचं आहे. नकारात्मकता फक्त नकारात्मकतेला वाढवते आणि तुम्हाला स्वत:ला त्यापासून दूर राहावं लागतं.”
दरम्यान, सतत फ्लॉप होणारे चित्रपट, मलायकासोबतचं रिलेशनशिप आणि ब्रेकअप या सर्व कारणांमुळे अर्जुनला सतत ट्रोल केलं जात होतं. यावर जान्हवीने पुढे ट्रोल करण्यांना सुनावले आहे. Janhvi Kapoor
जान्हवी कपूरच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, तिने २०१८ मध्ये इशान खट्टरसह ‘धडक’ चित्रपटातून आपल्या बॉलिवूड करिअरची सुरुवात केली होती. अलिकडेच ती ‘सनी संस्कारी की तुलसी कुमारी’ या चित्रपटात दिसली होती. लवकरच जान्हवी राम चरण स्टारर ‘पेड्डी’ या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.






