arjun kapoor: बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा आता एकत्र नसले तरी दोघांची मैत्री अजूनही कायम आहे. मलायका आज आपला ५२वा वाढदिवस साजरा करत असून, या निमित्ताने अर्जुनने तिला एक खास शुभेच्छा संदेश दिला आहे. अर्जुन कपूरने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर मलायकाचा एक फोटो शेअर करत लिहिले, “जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा, मलायका. तू नेहमी उंच भरारी घे, हसत राहा आणि आयुष्यात नवीन गोष्टी शोधत राहा.” या संदेशासोबत त्याने मलायकाचा पॅरिस टूरमधील एक जुना फोटो शेअर केला आहे, ज्यात ती खूप एलिगंट आणि आत्मविश्वासपूर्ण दिसत आहे. अर्जुनच्या या पोस्टवर चाहत्यांनीही शुभेच्छांचा वर्षाव केला. मलायका अरोराची वैयक्तिक आणि व्यावसायिक वाटचाल मलायकाने बॉलिवूडमध्ये आपल्या डान्स स्टाईल आणि ग्लॅमरमुळे वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिने करिअर फक्त चित्रपटांपुरते मर्यादित न ठेवता फॅशन आणि रिअॅलिटी शोच्या जगातही आपला ठसा उमटवला आहे. मलायका पूर्वी अभिनेता आणि निर्माता अरबाज खान यांच्या पत्नी होत्या. दोघांनी 1998 साली लग्न केले आणि त्यांना अरहान खान नावाचा मुलगा आहे. मात्र 2016 मध्ये दोघांचे विभाजन झाले. त्यानंतर मलायकाने काही वर्षे अर्जुन कपूरला डेट केले, आणि त्यांच्या नात्याची चर्चा अनेकदा झाली. कामाच्या आघाडीवर मलायका अरोरा अलीकडेच मलायका ‘थामा’ या चित्रपटाच्या गाण्यात दिसली. या गाण्यात तिच्यासोबत रश्मिका मंदानाही होती. गाण्यात मलायकाच्या एनर्जी आणि स्टाईलने प्रेक्षकांची मने जिंकली वयाच्या या टप्प्यावरसुद्धा ती नवोदित अभिनेत्रींपेक्षा काहीच कमी वाटली नाही. अर्जुन कपूरच्या या मनापासून दिलेल्या शुभेच्छांमुळे दोघांमधील मैत्री आणि आदर अजूनही कायम असल्याचे दिसून येते. मलायका आजही तिच्या आत्मविश्वास, सौंदर्य आणि डान्ससाठी चाहत्यांच्या मनात विशेष स्थान टिकवून आहे.