Malaika Arora | बॉलीवूड अभिनेत्री मलायका अरोरा कोणत्या न कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असते. मलायकाला तिच्या लूकसाठी अनेकदा ट्रोल केले जाते. अरबाज खानसोबत घटस्फोट, त्यानंतर अर्जुन कपूरसोबत रिलेशनशिपच्या चर्चा आणि ब्रेकअप झाल्यानंतर ती अधिक चर्चेत आली. यामुळे तिच्यावर टीकाही झाली. यावर आता तिने एका मुलाखतीत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. “सुरुवातीला माझ्यासाठी हे खूप कठीण होतं. कारण लोक मला सांगायचे की, मी काय करावं आणि काय करू नये. माझं करिअर, माझे कपडे, माझी नाती या सर्व गोष्टींवरून मला जज केलं गेलं. जेव्हा मी स्वतःला स्पष्टीकरण देणे थांबवले तेव्हा मला मोकळे वाटले. तुम्ही स्वतःसाठी तयार केलेली कथाच महत्त्वाची असते,” असे मलायका म्हणाली. अरबाज खानसोबत घटस्फोट घेतल्यानंतर झालेल्या टीकेबद्दल बोलताना ती म्हणाली, “मला असंही बोलण्यात आलं की तू खूप बोल्ड आहेस, फटकळ आहेस. पण, हेच माझ्या वागण्यातील खरेपण आहे. फॅशन असो, फिटनेस असो किंवा मी निवडलेला मार्ग असो, मी कधीही एक निश्चित फॉर्म्युला पाळला नाही. माझ्यासाठी खरा आत्मविश्वास तेव्हा येतो जेव्हा तुम्ही जगासाठी कामगिरी करणं थांबवता आणि स्वतःसाठी जगायला सुरुवात करता.” Malaika Arora | हा एक मानवी स्वभाव… पुढे ती म्हणाली, “स्वतःबद्दल शंका निर्माण होणं, हा एक मानवी स्वभाव आहे. असे विचार मनात येतच असतात. प्रत्येकाच्या आयुष्यात असे दिवस येतात, माझा स्वत:शीच एक वाद सुरु असतो. गेल्या काही वर्षांत मी त्या गोष्टी टीका म्हणून घेण्यापेक्षा सकारात्मक दृष्टिकोनातून घेण्यास सुरुवात केली आहे,” अशी भावना मलायकाने व्यक्त केली. दरम्यान, मलायका अरोराने वयाच्या २५ व्या वर्षी अभिनेता अरबाज खानबरोबर लग्न केले. मात्र, १९ वर्षांनंतर त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. २०१७ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर ती अर्जुन कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती. मात्र त्यांचेही ब्रेकअप झाले. Malaika Arora | हेही वाचा : डोनाल्ड ट्रम्प यांनी दिल्या पंतप्रधानांना वाढदिवसाच्या शुभेच्छा ; फोनवर झाली ‘या’ मुद्द्यांवर चर्चा