Dhanashree Verma : ‘अरे भाई, व्हॉट्सॲपवर मेसेज करायचा, टी-शर्ट का घातला?’, चहलच्या ‘Sugar Daddy’ टी-शर्टवर धनश्रीची प्रतिक्रिया

Dhanashree Verma statement about Yuzvendra Chahal : इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) 2025 सुरू होण्यापूर्वी भारतीय क्रिकेटपटू युझवेंद्र चहल आणि कॉरिओग्राफर धनश्री वर्मा यांच्या घटस्फोटाची बातमी चर्चेत आली. 22 डिसेंबर 2020 रोजी लग्नबंधनात अडकलेल्या या जोडप्यामधील नात्यात बिनसले आणि अखेर 20 फेब्रुवारी 2025 रोजी त्यांनी घटस्फोट घेतला. आता धनश्री वर्माच्या एका वक्तव्याने या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. तो काय आहे? जाणून घेऊया.
या घटस्फोटाच्या दिवशी चहलने कोर्टात परिधान केलेला टी-शर्टही चर्चेचा विषय ठरला होता. चहलच्या टी-शर्टवर ‘Be Your Own Sugar Daddy’ असा मजकूर होता, ज्याचा अर्थ ‘श्रीमंत पुरुषांना फसवणाऱ्या महिलेचा प्रियकर’ असा होतो. या टी-शर्टद्वारे चहलने धनश्रीला टोमणा मारल्याचे मानले गेले. आता धनश्रीने यावर प्रथमच प्रत्युत्तर दिले आहे.
धनश्री वर्माने काय दिले प्रत्युत्तर –
Yuzvendra Chahal did right #DhanashreeVerma pic.twitter.com/4dgJiectHZ
— Diksha 🌸 (@DikshaYrrr) August 20, 2025
ह्यूमन्स ऑफ बॉम्बेशी बोलताना धनश्री वर्माने घटस्फोट हा कधीच सोपा नसतो आणि तो साजरा करण्याची गोष्ट नसल्याचे मान्य केले. तिने सांगितले की, कोणत्याही वक्तव्याने कुटुंबाच्या मूल्यांना हानी पोहोचवण्यापेक्षा हा विषय परिपक्वपणे हाताळणे तिला योग्य वाटले. धनश्री म्हणाली, “मी त्याच्या किंवा माझ्या कुटुंबाची मूल्ये खराब करू इच्छित नव्हते. आम्ही एकमेकांचा आदर राखला पाहिजे.”
घटस्फोटाच्या दिवशी ती पूर्णपणे खचली होती आणि खूप रडली होती, असे तिने सांगितले. ती कोर्टाच्या मागील दरवाजाने बाहेर पडली होती. चहलच्या टी-शर्टबद्दल तिला सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या छायाचित्रांमधून कळले. यावर धनश्री म्हणाली, “अरे भाई, व्हॉट्सॲपवर मेसेज करायचा, टी-शर्ट का घातला?”
हेही वाचा – ICC ODI Ranking : आयसीसीच्या वनडे क्रमवारीमुळे उडाली खळबळ! विराट-रोहितचे नाव गायब झाल्याने चर्चेला उधाण
भारतीय संघात स्थान मिळवण्यात चहल पुन्हा अपयशी –
35 वर्षीय लेगस्पिनर युझवेंद्र चहल भारतासाठी शेवटचा सामना 2023 मध्ये खेळला होता. तो बऱ्याच काळापासून भारतीय संघातून बाहेर आहेत. आशिया कप 2025 साठीही त्याची संघात निवड झालेली नाही. त्यामुळे पुन्हा एकदा त्याची निराशा झाली आहे.





