Prithvi Shaw : ‘आता मला कोणाच्याही सहानुभूतीची गरज नाही…!’, महाराष्ट्रकडून तडाखेबंद शतक ठोकल्यानंतर पृथ्वी शॉचं वक्तव्य

महाराष्ट्रकडून पदार्पण करताना ठोकलं शानदार शतक –
मुंबई सोडून महाराष्ट्र संघात सामील झालेल्या पृथ्वीने मंगळवारी छत्तीसगडविरुद्ध बुची बाबू स्पर्धेत तडाखेबंद शतक ठोकत सर्वांचे लक्ष वेधले. चेन्नईच्या गुरु नानक कॉलेज मैदानावर महाराष्ट्रकडून पदार्पण करताना पृथ्वीने 141 चेंडूंमध्ये 111 धावांची खणखणीत खेळी साकारली. यात 14 चौकार आणि एक षटकार समाविष्ट होता. या शतकाने त्याने भारतीय संघात पुनरागमनासाठी कोणत्याही सहानुभूतीची गरज नसल्याचे स्पष्ट केले. या खेळीने त्याचा आत्मविश्वास आणखी बळकट झाला आहे.
आंतरराष्ट्रीय पुनरागमनासाठी सहानुभूती नको: पृथ्वी शॉ
Prithvi Shaw registers his first century for Maharashtra at the Buchi Babu Trophy 2025-26.
A composed yet commanding knock, reaching the three-figure mark in 122 balls – a debut season landmark to remember! 🌟 pic.twitter.com/c5HqEdcbow— Maharashtra Cricket Association (@MahaCricket) August 19, 2025
इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, पृथ्वी म्हणाला, “मला कोणाच्याही सहानुभूतीची गरज नाही.” छत्तीसगडविरुद्धच्या सामन्यात महाराष्ट्राची फलंदाजी अडचणीत असताना त्याने एकट्याने आघाडी घेत शतक ठोकले. तो म्हणाला, “मला पुन्हा नव्याने सुरुवात करण्यात काहीच हरकत नाही. मी आयुष्यात अनेक चढ-उतार पाहिले आहेत. मी वर गेलो, खाली आलो, पुन्हा वर गेलो. मला वाटतं, सर्व काही शक्य आहे. मी स्वतःवर आणि माझ्या कार्यशैलीवर पूर्ण विश्वास ठेवतो. मला खात्री आहे की हा हंगाम माझ्यासाठी आणि माझ्या संघासाठी खूप चांगला असेल.”
हेही वाचा – ICC ODI Ranking : आयसीसीच्या वनडे क्रमवारीमुळे उडाली खळबळ! विराट-रोहितचे नाव गायब झाल्याने चर्चेला उधाण
मी फक्त मूळ गोष्टींकडे परतलो – पृथ्वी शॉ
भारतीय संघात स्थान मिळवण्यात अपयश, आयपीएलमध्ये विकला न जाणे आणि मुंबईच्या रणजी संघातून बाहेर फेकले जाणे यानंतर पृथ्वीने महाराष्ट्रात येण्याचा निर्णय घेतला. याबाबत तो म्हणाला, “मी काहीही बदलू इच्छित नाही. मी फक्त मूळ गोष्टींकडे परतलो आहे. अंडर-19 मध्ये ज्या गोष्टी मला भारतीय संघापर्यंत घेऊन गेल्या, त्या पुन्हा करत आहे – सराव, जिम, धावणे. या छोट्या गोष्टी मी 12-13 वर्षांचा असल्यापासून करत आहे.”
सोशल मीडियापासून दूर राहण्याचा फायदा –
सोशल मीडियाबाबत तो म्हणाला, “मी स्वतःला सांभाळण्याचा प्रयत्न करत आहे आणि सोशल मीडियासारख्या गोष्टींपासून दूर राहतो. आजकाल सोशल मीडिया खूपच वाईट आहे. जेव्हा मी त्याचा वापर करत नाही, तेव्हा माझ्यासाठी गोष्टी बऱ्याच चांगल्या असतात.”





