Arctic Open 2024 : आर्क्टिक ओपनमध्ये भारताची निराशजनक कामगिरी, लक्ष्य सेनच्या पराभवासह स्पर्धेतील मोहीम समाप्त…

Arctic Open 2024 :- भारताचा स्टार बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनसह सर्व खेळाडूंचे आर्क्टिक खुल्या बॅडमिंटन स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. 23 वर्षीय लक्ष्यला गुरुवारी दुसऱ्या फेरीत सातव्या मानांकित चायनीज तैपेईच्या चौ तिएन चेनकडून 21-19, 18-21, 15-21 असा पराभव पत्करावा लागला. हा सामना एक तास 10 मिनिटे चालला.
भारतासाठी गुरूवारचा दिवस खूप वाईट होता कारण लक्ष्य सेनसह भारताचे सर्व खेळाडूंचे दुसऱ्या फेरीतील पराभवासह स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. अन्य लढतीत किरण जॉर्जला पुरुष एकेरीत पाचव्या मानांकित इंडोनेशियाच्या जोनाथन क्रिस्टीकडून 17-21,08-21 असा पराभव पत्करावा लागला.
दुसरीकडे महिला एकेरीत मालविका बनसोडला रत्चानोक इंतानोनकडून 15-21, 08-21 असा पराभव पत्करावा लागला. उन्नती हुड्डा आणि आकर्षी कश्यप यांचा राउंड ऑफ 16 च्या सामन्यात पराभव झाला. उन्नती कॅनडाच्या मिशेल ली हिच्याकडून 10-21, 19-21 ने पराभूत झाली तर आकर्षीला द्वितीय मानांकित चीनच्या हान यू हिच्याकडून 9-21, 8-21 ने पराभव पत्करावा लागला.
🇮🇳🏸 #ArcticOpen2024 – Round of 16 updates!
❌ Lakshya Sen faced a hard-fought defeat against 🇹🇼’s Chou Tien, 21-19, 18-21, 15-21, in the Men’s Singles R16, ending his run at the Arctic Open 2024.
❌ Aakarshi Kashyap’s journey at the Arctic Open 2024 came to an end after she… pic.twitter.com/H4Z2CEzeKQ
— Sportwalk Media (@sportwalkmedia) October 10, 2024
मिश्र दुहेरीत सतीश कुमार करुणाकरन आणि आद्या वरियाथ जोडीला चेंग जिंग आणि झांग ची यांच्याकडून 12-21,15-21 असा पराभव पत्करावा लागला. दिवसाच्या अंतिम भारतीय सामन्यात रुतापर्णा पांडा आणि श्वेतापर्णा पांडा या महिला दुहेरीच्या जोडीला अव्वल मानांकित लिऊ शेंग शू आणि टॅन निंग यांच्याकडून 8-21, 10-21 असा पराभव पत्करावा लागला. यासह भारताचे स्पर्धेतील आव्हान अवघ्या दुसऱ्या फेरीतच संपुष्टात आले.
Arctic Open 2024 Badminton : ज्याची भीती होती तेच झालं; सिंधूच्या पदरी पुन्हा निराशा…
दरम्यान, दोन वेळची ऑलिम्पिक पदक विजेती आणि भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधूचे तर पहिल्याच स्पर्धेत आव्हान संपुष्टात आले होते. तिला पहिल्या फेरीत कॅनडाच्या मिशेल लीकडून पराभव पत्करावा लागला. मिशेलने सिंधूला केवळ 37 मिनिटांच्या लढतीत 21-16,21-10 असे पराभूत केले होते.





