सलमान खानबाबत प्रश्न विचारताच अरबाज पत्रकारावर भडकला

Arbaaz Khan | बॉलिवूड अभिनेता अरबाज खान लवकरच ‘काल त्रिघोरी’ या चित्रपटात दिसणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला आहे. या ट्रेलर लाँचच्या वेळेस पत्रकाराने अभिनेता सलमान खानबद्दल अरबाजला प्रश्न विचारायचा प्रयत्न केला. मात्र अरबाजने पत्रकाराला रोखत त्याला चांगलेच सुनावले.
पत्रकाराने अरबाजला विचारलं की, ”सलमान खानचे किस्से आम्हाला माहितच आहेत.” त्यावेळी अरबाजने पत्रकाराला अडवत, ”काय किस्से माहित आहेत तुला? सलमान खान आणि कुटुंबाला मध्ये आणणं गरजेचं आहे का? हा प्रश्न त्याचं नाव न घेताही विचारला जाऊ शकतो ना? तुला मी खूप आधीपासून ओळखतो. जोवर तू असा काही प्रश्न विचारत नाहीस तोवर तुला चैन पडत नाही. सर्वांचे प्रश्न संपण्याची तू वाट बघतोस त्यानंतर असा प्रश्न विचारतोस.” Arbaaz Khan |
View this post on Instagram
”तू आधी प्रश्न पुन्हा चांगल्या भाषेत विचार. जर तुला किस्से माहित आहेत तर वारंवार तेच कशाला विचारतोयस. तू जेव्हा सलमान खानची मुलाखत घेशील तेव्हा त्याला हे विचार. सध्या त्रिघोरीबद्दल चर्चा कर. माझा छोटा भाऊ सोहेलचं नाव घेऊन तू फिरत आहेस. जणू काही तुझ्यासाठी ते ओझं आहे”, अशाप्रकारे अरबाजने त्या पत्रकाराची बोलती बंद केली. Arbaaz Khan |
अरबाज खानची प्रमुख भूमिका असलेला ‘काल त्रिघोरी’ हा सिनेमा १४ नोव्हेंबरला रिलीज होणार आहे. या सिनेमात अरबाजसोबत महेश मांजरेकर, आदित्य श्रीवास्तव, रितूपर्णा सेनगुप्ता या कलाकारांची प्रमुख भूमिका असणार आहे.
हेही वाचा:
“वयस्कर लोक तरुणांपेक्षा अफेअर्स उत्तमरित्या लपवतात”; ट्विंकल खन्नाचे विधान पुन्हा एकदा चर्चेत





