Disha Patani : ‘दिशा पटानी’ ची अभिनयापाठोपाठ फॅशनविश्वातही जोरदार एन्ट्री; ‘DZ’ ब्रँडमधून सुरू केला नवा व्यवसाय
या कलेक्शनमध्ये सैलसर, बॅगी आणि ओव्हरसाइज्ड कपड्यांना प्राधान्य देण्यात आलं आहे. विशेष म्हणजे, अंतराळ आणि एलियनपासून प्रेरित ग्राफिक्स आणि वेगळ्या डिझाइन्स हे या ब्रँडचं प्रमुख आकर्षण आहे.

Disha Patani : बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी आपल्या बोल्ड लूक, ग्लॅमरस अंदाज आणि हटके फॅशन स्टाइलमुळे नेहमीच चर्चेत असते. तिच्या प्रत्येक लूकची सोशल मीडियावर चर्चा रंगते. मात्र, यावेळी दिशाने केवळ आपल्या सौंदर्याने किंवा अभिनयाने नव्हे, तर थेट व्यवसायविश्वात पाऊल ठेवत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
गेल्या दशकभरापासून चित्रपटांमधून चाहत्यांच्या मनावर राज्य करणाऱ्या दिशाने आता स्वतःचा ‘DZ’ हा कपड्यांचा ब्रँड लॉन्च केला आहे. विशेष म्हणजे, या ब्रँडच्या प्रमोशनसाठी तिने असा काही हटके अवतार धारण केला आहे की, तिचे फोटो आणि व्हिडीओ पाहून चाहतेही थक्क झाले आहेत.
बॅगी आणि ओव्हरसाइज्ड कपडे, अंतराळ आणि एलियनपासून प्रेरित डिझाइन्स, त्यात ब्लिच केलेल्या भुवया आणि एकदम हटके लूक! दिशाचा हा नवा अवतार तिच्या नेहमीच्या ग्लॅमरस प्रतिमेपेक्षा खूपच वेगळा आहे. अभिनयासोबतच आता फॅशनच्या दुनियेतही स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी दिशा सज्ज झाली आहे.
या कलेक्शनमध्ये सैलसर, बॅगी आणि ओव्हरसाइज्ड कपड्यांना प्राधान्य देण्यात आलं आहे. विशेष म्हणजे, अंतराळ आणि एलियनपासून प्रेरित ग्राफिक्स आणि वेगळ्या डिझाइन्स हे या ब्रँडचं प्रमुख आकर्षण आहे.
दिशाला स्वतःलाही आरामदायी आणि हटके फॅशनची आवड आहे. त्यामुळे तिच्या याच आवडीचं प्रतिबिंब ‘DZ’च्या कलेक्शनमध्ये पाहायला मिळत आहे. आपल्या वॉर्डरोबमध्ये काहीतरी वेगळं आणि प्रयोगशील आणू इच्छिणाऱ्या फॅशनप्रेमींसाठी हा ब्रँड आकर्षण ठरू शकतो.
हॉलिवूडमध्येही झळकणार दिशा पटानी!
दरम्यान, दिशाच्या व्यावसायिक आयुष्यात आणखी एक मोठी घडामोड घडत आहे. ‘Holiguards Saga – The Portal of Force’ या सुपरनॅचरल अॅक्शन-फँटसी चित्रपटातून ती आंतरराष्ट्रीय चित्रपटविश्वात पदार्पण करत आहे.
या चित्रपटात दिशा जेसिका नावाची भूमिका साकारत असून तिच्यासोबत केविन स्पेसी, टायरेस गिब्सन आणि डॉल्फ लंडग्रेन हे कलाकारही आहेत. या चित्रपटाचा ट्रेलरही प्रदर्शित झाला आहे.
याशिवाय दिशा ‘कल्की २८९८ एडी’च्या पुढील भागातही दिसणार आहे. एकीकडे अभिनय, दुसरीकडे फॅशन ब्रँड आणि आता आंतरराष्ट्रीय चित्रपटविश्वातील संधी, अशा वेगवेगळ्या क्षेत्रांत दिशा आपली कारकीर्द विस्तारताना दिसत आहे.








