Manoj Jarange : मनोज जरांगेंना उपोषण मागे घेण्याचे आवाहन; थेट डॉक्टरांना म्हणाले, तुम्ही यात पडू नका.!
जरांगे यांनी मी तुमचा आदर करतो, पण तुम्ही सरकारची बाजू मांडायला आला आहात का? हा निर्णय राज्य सरकारच्या स्तरावर होणारा आहे, त्यामुळे तुम्ही यात पडू नका.

Manoj Jarange – मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या अंतरवाली सराटी येथील आमरण उपोषणाचा बुधवारी ५ वा दिवस उजाडला.
सलग उपोषणामुळे जरांगे यांची प्रकृती खालावत असून त्यांच्या रक्तातील शर्करेचे प्रमाण कमी झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. वैद्यकीय पथकाने त्यांना सलाईन घेण्याचा सल्ला दिला, मात्र त्यांनी त्यास ठाम नकार दिला आहे. ( Manoj Jarange )

Manoj Jarange : मनोज जरांगेंना उपोषण मागे घेण्याचे आवाहन; थेट डॉक्टरांना म्हणाले, तुम्ही यात पडू नका.!
दरम्यान, जालन्याच्या जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी मंगळवारी रात्री उपोषणस्थळी जाऊन जरांगे यांची भेट घेतली आणि उपोषण मागे घेण्याचे आवाहन केले.
शासनाचा प्रतिनिधी म्हणून मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या मित्तल यांनी मराठा आरक्षणाबाबत सरकारने आतापर्यंत घेतलेल्या निर्णयांची माहिती देण्याचा प्रयत्न केला.
मात्र जरांगे यांनी मी तुमचा आदर करतो, पण तुम्ही सरकारची बाजू मांडायला आला आहात का? हा निर्णय राज्य सरकारच्या स्तरावर होणारा आहे, त्यामुळे तुम्ही यात पडू नका. ( Manoj Jarange )
सरकार तुम्हाला मध्यस्थीसाठी पाठवून वेळकाढूपणा करत आहे. कृपया तुम्ही या विषयावर पुन्हा मला भेटायला येऊ नका असे त्यांनी म्हटले.





