Indian football : “प्रतिभावान खेळाडूंनी वाद-विवादांपासून…” सुनील छेत्रीचा अन्वर अलीला सल्ला
Updated On:

India National Football Team – भारताचा माजी कर्णधार असलेल्या सुनील छेत्रीने सेंटर बॅक असलेला अन्वर अली हा भारतीय संघासाठी महत्वाचा खेळाडू असल्याचे सांगताना अशा प्रतिभावान खेळाडूंनी वाद-विवादांपासून दूर राहावे, असा सल्ला दिला.
भारतीय फुटबॉल महासंघाने अन्वर अलीवर चार महिन्यांची बंदी घातली होती. अन्वर अलीने कोलकाता येथील मोहन बागान सोबतचा करार संपुष्टात आणून तो पुन्हा दिल्ली एफसी संघाकडे परतला होता. यासाठी त्याला ईस्ट बंगाल क्लबने दोषी ठरवले होते, व त्यावर दंड ठोठावण्याची मागणी केली होती.
या संदर्भात छेत्री म्हणाला की, या प्रकरणाचा संपूर्ण तपशील माझ्याकडे नसला तरी, तरी देखील तो चांगला खेळाडू आहे. राष्ट्रीय संघात देखील त्याचे महत्वाचे स्थान आहे. त्यामुळे अशा खेळाडूंनी वाद ओढवून घेऊ नयेत, असे तो म्हणाला.





