Indian Football Team New Captain : भारतीय फुटबॉल स्टार सुनील छेत्रीने नुकतीच आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती घेतली आहे. तो भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधारही होता. अशा परिस्थितीत सुनील छेत्रीच्या निवृत्तीनंतर भारतीय फुटबॉल संघाला नव्या कर्णधाराची घोषणा करावी लागली आहे. संघाचा नवा कर्णधार कतारविरुद्ध 2026 फिफा विश्वचषक पात्रता सामन्यापासून संघाची कमान सांभाळेल. हा सामना 11 जून रोजी होणार आहे. कतार विरुद्ध 2026 फिफा विश्वचषक पात्रता सामन्यासाठी भारताचा प्रथम पसंतीचा गोलरक्षक गुरप्रीत सिंग संधूची (Gurpreet Singh Sandhu ) संघाचा कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मंगळवारी जस्सिम बिन हमाद स्टेडियमवर भारताचा सामना यजमान कतारशी होणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघ शनिवारी रात्री दोहाला पोहोचला. हा सामना जिंकून संघ प्रथमच विश्वचषक पात्रता फेरीच्या तिसऱ्या टप्प्यात प्रवेश करू शकतो. भारतीय संघ हा सामना हरल्यास विश्वचषक पात्रता फेरीच्या तिसऱ्या टप्प्यातून बाहेर पडेल. या गटात अव्वल स्थान पटकावत कतार आधीच तिसऱ्या टप्प्यासाठी पात्र ठरला आहे. भारत पाच गुणांसह कतारनंतर दुसऱ्या स्थानावर आहे. अफगाणिस्तान पाच गुणांसह तिसऱ्या तर कुवेत तीन गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. सुनील छेत्रीच्या निवृत्तीनंतर भारताचा हा पहिलाच सामना असेल. कुवेतविरुद्धच्या गोलशून्य बरोबरीनंतर छेत्रीने नुकतीच आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती घेतली होती. T20 World Cup 2024 : टीम इंडियाने पाकिस्तानविरुद्ध विजयासह रचला इतिहास… गुरप्रीतकडे कर्णधारपद सोपवणे अवघड काम नव्हते – हेड कोच स्टिमक हेड कोच इगोर स्टिमकने सांगितले की, गुरप्रीतकडे कर्णधारपद सोपवणे अवघड काम नव्हते. हा 32 वर्षीय खेळाडू 71 आंतरराष्ट्रीय सामन्यांसह संघाचा सर्वात अनुभवी खेळाडू आहे. स्टिमॅकने सांगितले की, गुरप्रीतने गेल्या पाच वर्षांपासून सुनील आणि संदेश (झिंगन) यांच्यासोबत काही सामन्यांमध्ये कर्णधारपदाची जबाबदारी दिली आहे. त्यामुळे साहजिकच तो यासाठी दावेदार होता.