नवी दिल्ली – मध्य प्रदेशातील मुरैना जिल्ह्यात वंदे भारत गाडीवर पुन्हा दगडफेकीचा प्रकार घडला आहे. एका व्यक्तीने दगडफेक केल्याने भोपाळ-दिल्ली वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनच्या काचेच्या खिडकीचे नुकसान झाले, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
ही घटना बनमोर रेल्वे स्थानकाजवळ रविवारी सकाळी 10 वाजता घडली. रेल्वे संरक्षण दलाने या संदर्भात एका व्यक्तीला अटक केली आहे.या दगडफेकीमुळे प्रवांशांमध्ये काहीसे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर पोलिसांनी रविवारी रात्री दगडफेकीच्या प्रकरणी फिरोज खाननावाच्या एका व्यक्तीला अटक केली आणि त्याच्यावर रेल्वे कायद्याच्या तरतुदींनुसार गुन्हा दाखल केला आहे.
आरोपीने हा गुन्हा कबुल केला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. देशाच्या अनेक भागात वंदे भारत रेल्वे गाडीवर दगडफेकीच्या अनेक घटना घडल्या आहेत.