PUNE : महापालिकेत आणखी एक पदभरती; 110 पदांच्या भरतीस स्थायी समितीत मान्यता

पुणे – महापालिकेतील मोठ्या प्रमाणात कर्मचारी 2022 ते 2024 या कालावधीत सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या विभागांत टप्प्याटप्प्याने कर्मचारी भरती केली जात आहे. पहिल्या टप्प्यात 445 दुसऱ्या टप्प्यात 321 कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया झाली असतानाच, तिसऱ्या टप्प्यातील 110 पदांच्या भरतीस शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
याबाबत आयुक्त विक्रम कुमार यांनी महापालिका दिली. सहा महिन्यांपूर्वी लिपिक, कनिष्ठ अभियंता, अतिक्रमण नियंत्रण निरीक्षक यासारख्या अन्य पदांसाठी भरती झाली. तसेच येत्या काळात आरोग्य विभाग, अग्निशमन दलासह अन्य काही पदांसाठी भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.
ही भरणार पदे
उपमुख्य अग्निशमन अधिकारी – 1, विभागीय अग्निशमन अधिकारी – 1, सहायक विभागीय अग्निशमन अधिकारी – 1, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) – 100, उपकामगार अधिकारी – 7 अशी 110 पदे सरळ सेवा पद्धतीने भरली जाणार आहेत. 23 गावे समाविष्ट झाल्याने ग्रामपंचायतींचे काही कर्मचारी महापालिकेकडे वर्ग झाले आहेत. परंतू त्यांच्याकडे अभियंता हे पद नाही. यामुळे अभियंत्यांची संख्या वाढवण्यात येणार आहे.





