Angkrish Raghuvanshi Controversy : नियम की अंपायरची चूक? अंगकृष रघुवंशीच्या ‘त्या’ विकेट्सनी पेटला वाद; KKR च्या ताफ्यात संतापाचा उद्रेक, पाहा VIDEO
Angkrish Raghuvanshi Controversy : कोलकाताचा युवा फलंदाज अंगकृष रघुवंशी याला ज्या पद्धतीने बाद देण्यात आले. यानंतर अंगकृष रघुवंशी रागाने बॅट आणि हेल्मेट फेकून दिले, ज्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

Angkrish Raghuvanshi Obstructing the Field Controversy: आयपीएल २०२६ च्या ३८ व्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्स आणि कोलकाता नाइट रायडर्स (KKR) यांच्यातील लढतीला एका मोठ्या वादाचे गालबोट लागले आहे. कोलकाताचा युवा फलंदाज अंगकृष रघुवंशी याला ज्या पद्धतीने बाद देण्यात आले. यानंतर अंगकृष रघुवंशी रागाने बॅट आणि हेल्मेट फेकून दिले, ज्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे मैदानावर संतापाचे वातावरण निर्माण झाले असून अंपायरिंगवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे
नेमकं घडलं काय?
अंगकृष रघुवंशी ९ धावांवर खेळत असताना त्याने एक चेंडू हलक्या हाताने खेळून धाव घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, नॉन-स्ट्रायकर एंडला असलेल्या कॅमेरून ग्रीनने नकार दिल्यामुळे तो पुन्हा आपल्या क्रीझकडे धावला. यावेळी रघुवंशीने ज्या बाजूने चेंडू येत होता, त्याच दिशेने धावण्याचा प्रयत्न केला. टीव्ही अंपायरने रिप्लेमध्ये पाहिल्यांनंतर त्यांना वाटले की, रघुवंशीने चेंडूची दिशा पाहून जाणीवपूर्वक आपला मार्ग बदलला, ज्यामुळे फिल्डरच्या थ्रोमध्ये अडथळा निर्माण झाला. ‘ऑब्स्ट्रक्टिंग द फील्ड’ या नियमांनुसार ही कृती अवैध ठरवून त्याला बाद देण्यात आले.
KKR ತಂಡಕ್ಕಂತೂ ಇದು ನಿಜಕ್ಕೂ ನುಂಗಲಾರದ ತುತ್ತು! ‘Obstruction of Field’ ಅಂತ Raghuvanshi ಗೆ ಔಟ್ ಕೊಡಲಾಗಿದೆ.☝️
ನಿಮ್ಮ ಪ್ರಕಾರ ಇದು Out? ಅಥವಾ Not Out? 👀
ವೀಕ್ಷಿಸಿ | #TATAIPL2026 👉 #LSGvsKKR | LIVE NOW | ನಿಮ್ಮ Star Sports ಕನ್ನಡ & JioHotstar ನಲ್ಲಿ.#TATAIPL #AngkrishRaghuvanshi pic.twitter.com/cPsuy1J2p7
— Star Sports Kannada (@StarSportsKan) April 26, 2026
केकेआरच्या डगआऊटमध्ये संतापाची लाट –
Nah man another day another mockery for KKR.😭🤣
Angkrish Raghuvanshi was given out for this OBSTRUCTING THE FEILD decision .😭🙏🏻 pic.twitter.com/mBXuUMlNV4
— U’ (@toxifyxe) April 26, 2026
हा निर्णय ऐकताच रघुवंशीने सीमारेषेच्या बाहेर गेल्यानंतर संतापून आपली बॅट आपटली आणि हेल्मेट फेकून दिले. तसेच केकेआरचे मुख्य प्रशिक्षक अभिषेक नायर यांनी तातडीने चौथ्या पंचांशी चर्चा करून नाराजी व्यक्त केली, तर सहाय्यक प्रशिक्षक शेन वॉटसनही चकित झाले. आयपीएलच्या १८ वर्षांच्या इतिहासात अशा पद्धतीने बाद होणारा तो केवळ चौथा खेळाडू ठरला आहे. या निर्णयामुळे सोशल मीडियावरही चाहत्यांनी संताप व्यक्त केला असून, ही अंपायरिंगमधील चूक आहे की नियमांचा अचूक वापर, यावर चर्चा रंगली आहे.
आयपीएलमध्ये ‘फील्डिंगमध्ये अडथळा’ आणला म्हणून बाद झालेले खेळाडू:
- युसूफ पठाण (२०१३)
- अमित मिश्रा (२०१९)
- रवींद्र जडेजा (२०२४)
- अंगकृष रघुवंशी (२०२६)





