Harbhajan Singh Gaddar : भज्जीने भाजपमध्ये प्रवेश केल्याने समर्थक संतप्त! घराच्या भिंतीवर लिहिलं ‘गद्दार’, पाहा VIDEO
Harbhajan Singh Gaddar : हरभजन सिंगच्या भाजप प्रवेशामुळे संतप्त झालेल्या समर्थकांनी त्याच्या घराच्या भिंतीवर पंजाबी आणि इंग्रजी भाषेत 'गद्दार' (Traitor) असे लिहिले.

Gaddar written on Harbhajan Singh’s house : पंजाबमधील राजकारणात ‘आम आदमी पार्टी’ला (AAP) मोठा धक्का बसला असून, पक्षाच्या १० पैकी ७ राज्यसभा खासदारांनी भारतीय जनता पक्षात (भाजप) विलीन होण्याचा निर्णय घेतल्याने खळबळ उडाली आहे. यामध्ये भारताचा माजी दिग्गज क्रिकेटपटू हरभजन सिंग याचाही समावेश असल्याने पंजाबमध्ये संतापाची लाट उसळली आहे. भज्जीच्या या निर्णयामुळे संतप्त झालेल्या समर्थकांनी त्याच्या घराच्या भिंतीवर ‘गद्दार’ लिहून आक्रोश व्यक्त केला.
आम आदमी पार्टीच्या ७ राज्यसभा खासदारांनी २४ एप्रिल रोजी भाजपमध्ये प्रवेश केल्याने पंजाबमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या बंडखोरीत प्रामुख्याने हरभजन सिंग आणि राघव चड्ढा यांसारख्या मोठ्या नावांचा समावेश असल्याने ‘आप’ समर्थकांमध्ये प्रचंड रोष पाहायला मिळत आहे. जालंधर येथील हरभजन सिंगच्या घराबाहेर आंदोलकांनी मोठी गर्दी करत जोरदार घोषणाबाजी केली.
घराच्या भिंतीवर स्प्रे पेंटने लिहिलं ‘गद्दार’ –
Harbhajan Singh’s house has “gaddar” written outside by AAP workers after he joined the BJP.
They are literally writing it in front of the police. 👀 pic.twitter.com/ISQQDOGN1X
— Sonu (@Cricket_live247) April 26, 2026
हरभजन सिंगच्या भाजप प्रवेशामुळे संतप्त झालेल्या समर्थकांनी त्याच्या घराच्या भिंतीवर पंजाबी आणि इंग्रजी भाषेत ‘गद्दार’ (Traitor) असे लिहिले. सोशल मीडियावर याचे व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहेत. विशेष म्हणजे, पोलीस प्रशासनाच्या उपस्थितीतच हा प्रकार घडला. पोलिसांनी आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र हरभजनने मतदारांचा विश्वासघात केल्याचा आरोप करत समर्थकांनी आपला संताप व्यक्त केला.
AAP Workers wanted to Write ‘Gaddar’ (traitor) in english on Walls of Harbhajan Singh’s Residence in Jalandhar After Split from AAP but instead Wrote ‘Gadar’, which means rebellion or uprising 😂🤦 pic.twitter.com/yqsQdfoclZ
— Megh Updates 🚨™ (@MeghUpdates) April 25, 2026
‘आप’च्या १० पैकी ७ खासदारांचा भाजपमध्ये प्रवेश –
क्रिकेट के माध्यम से देश का नाम अंतरराष्ट्रीय पटल पर चमकाने वाले पूर्व क्रिकेटर हरभजन सिंह के घर पर पंजाब पुलिस के सामने कालिख से गद्दार लिखा जा रहा है।
इससे शर्मनाक कुछ हो सकता है क्या?pic.twitter.com/CYSr1o9Lb5
— Adv Sunil Sharma (@AdvSunilSharma_) April 25, 2026
राज्यसभेत आम आदमी पार्टीचे एकूण १० खासदार होते, त्यापैकी ७ जणांनी आता भाजपची वाट धरली आहे. यामध्ये हरभजन सिंग, राघव चड्ढा, स्वाती मालीवाल, अशोक मित्तल, संदीप पाठक आणि राजेंद्र गुप्ता यांसारख्या दिग्गज नेत्यांचा समावेश आहे. राघव चड्ढा यांनी पत्रकार परिषदेत आम आदमी पार्टीवर गंभीर आरोप करत भाजप प्रवेशाची घोषणा केली. यामुळे राज्यसभेतील गणिते पूर्णपणे बदलण्याची शक्यता आहे.
हरभजन सिंगने भारतासाठी १०३ कसोटीत ४१७ बळी घेत क्रिकेटमध्ये मोठे नाव कमावले, मात्र राजकारणातील या ‘गुगली’मुळे तो सध्या मोठ्या वादात अडकला आहे.





