Australian Open 2024 : अँडी मरेचे आव्हान संपुष्टात, अर्जेंटिनाच्या टॉमसनं केलं पराभूत…

मेलबर्न – इंग्लंडचा टेनिस स्टार अँडी मरे पहिल्या फेरीत पराभूत झाल्याने ऑस्ट्रेलियन ओपन 2024 स्पर्धेमधून बाहेर पडला आहे. त्याला सोमवारी स्पर्धेच्या पहिल्या फेरीत अर्जेंटिनाचा २४ वर्षीय टेनिसपटू टॉमस मार्टिनने सरळ सेटमध्ये पराभूत केले. तर दुसरीकडे याच स्पर्धेत जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकाचा खेळाडू डॅनिल मेदवेदेवने विजय मिळवत दुसरी फेरी गाठली आहे.
मार्टिनने तीन वेळचा ग्रँडस्लॅम चॅम्पियन मरेचा शो कोर्ट एरिना येथे 6-4, 6-2, 6-2 असा पराभव करून हंगामातील पहिल्या ग्रँड स्लॅम स्पर्धेत दुसरी फेरी गाठली. मार्टिनचा पुढील फेरीत फ्रान्सच्या गेल मॉन्फिल्सशी सामना होईल. मॉनफिल्सने पहिल्या फेरीत यानिक हॅन्फमनचा ६–४, ६–३, ७–५ असा पराभव केला.
Australian Open 2024 : सबालेन्काची आगेकूच, इला सीडलचा केला पराभव…
याच स्पर्धेत आणखी एका लढतीत सामन्याच्या मध्यंतराला फ्रान्सच्या टेरेन्स एटमानेची निवृत्ती पत्करल्यामुळे प्रतिस्पर्धी रशियाच्या तिसऱ्या मानांकित मेदवेदेव याला दुसऱ्या फेरीत प्रवेश मिळाला. 22 वर्षीय एटमाने याने माघार घेण्याचा निर्णय घेतला तेव्हा मेदवेदेव ५-७, ६-२, ६-४, १-० ने आघाडीवर होता. आता पुढील फेरीत मेदवेदेवचा सामना फिनलंडच्या एमिल रुसुवूओरीशी होणार आहे.





