Andaman Sea Tragedy : अंदमानजवळील समुद्रात एक भीषण सागरी दुर्घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. निर्वासितांनी भरलेले जहाज बुडाल्याने सुमारे २५० जणांचा बुडून मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. (Andaman Sea Tragedy) मिळालेल्या माहितीनुसार, हे जहाज दक्षिण बांगलादेश किनाऱ्यावरून निघून मलेशिया कडे जात होते. जहाजात रोहिंग्या निर्वासितांसह बांगलादेशी नागरिक मोठ्या संख्येने प्रवास करत होते. क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी असल्याने परिस्थिती अधिक धोकादायक झाली होती. ९ एप्रिल रोजी खवळलेल्या समुद्रात आणि वेगवान वाऱ्यांमुळे हे जहाज उलटल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. आतापर्यंत केवळ ९ जणांना वाचवण्यात यश आले असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (Andaman Sea Tragedy) Andaman Sea Tragedy : मोठी दुर्घटना! अंदमान समुद्रात २५० निर्वासितांसह जहाज बुडाले; केवळ ९ जणांना वाचवण्यात यश रोहिंग्या समाजातील हजारो लोक म्यानमार मधील अत्याचार आणि अस्थिरतेमुळे जीव धोक्यात घालून इतर देशांत स्थलांतर करत असतात. अशा प्रवासासाठी ते अनेकदा असुरक्षित आणि ओव्हरलोडेड बोटींचा वापर करतात. दरम्यान, UNHCR ने या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले असून रोहिंग्या निर्वासितांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हा समाज विस्थापन आणि संकटाचा सामना करत असल्याचेही त्यांनी नमूद केले. (Andaman Sea Tragedy)