प्रांजल खेवलकरच्या मोबाइलमध्ये 1779 ‘तसले’ फोटो-व्हिडिओ; रूपाली चाकणकरांचा गंभीर आरोप, एकनाथ खडसे म्हणाले – “पुरावे दाखवा, नाहीतर बदनामी थांबवा”

Updated On:
प्रांजल खेवलकरच्या मोबाइलमध्ये 1779 ‘तसले’ फोटो-व्हिडिओ; रूपाली चाकणकरांचा गंभीर आरोप, एकनाथ खडसे म्हणाले – “पुरावे दाखवा, नाहीतर बदनामी थांबवा”

पुणे/जळगाव : पुण्यातील खराडी येथील कथित रेव्ह पार्टी प्रकरणाने राजकीय वातावरण तापले असून, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेते एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांच्या अटकेनंतर या प्रकरणात धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषदेत खेवलकर यांच्या मोबाइलमध्ये १,७७९ अश्लील फोटो आणि व्हिडिओ आढळल्याचा दावा केला आहे. यासोबतच त्यांनी या प्रकरणात मानवी तस्करीचे रॅकेट असल्याचा गंभीर आरोप केला आहे.

मोबाइलमधील हिडन फोल्डरमधून खळबळजनक माहिती –
रूपाली चाकणकर यांनी सांगितले की, खेवलकर यांच्या इंद्रप्रस्थ सोसायटीतील घरातून जप्त केलेल्या मोबाइलचे सायबर तज्ज्ञांनी विश्लेषण केले. यात हिडन फोल्डरमध्ये २५२ व्हिडिओ आणि १,४९७ फोटो असे एकूण १,७७९ अश्लील फोटो-व्हिडिओ आढळले. यामध्ये महिलांचे नग्न व अर्धनग्न फोटो, अशोभनीय कृत्यांचे व्हिडिओ, आपत्तीजनक व्हॉट्सअॅप चॅट्स आणि पार्टीचे फोटो सापडले. चॅट्समधून सात मुलींची नावे ‘आरुष’ या नावाने सेव्ह केल्याचे उघड झाले. चाकणकर यांच्या मते, ‘आरुष’ नावाची व्यक्ती मुलींची मानवी तस्करी करत होती आणि त्यांना पुणे, लोणावळा, गोवा, साकीनाका आणि जळगाव येथील पार्ट्यांसाठी बोलावले जात होते.

सिनेमात कामाचे आमिष देऊन अत्याचार –
चाकणकर यांनी खुलासा केला की, २५ जून २०२५ रोजी खराडीतील हॉटेलमध्ये रात्री १० ते पहाटे ४ वाजेपर्यंत दारू आणि हुक्का पार्टी सुरू होती. या पार्ट्यांमध्ये मुलींना सिनेमात काम देण्याचे आमिष दाखवून बोलावले गेले. चॅट्समधून असे दिसते की, मुलींचा वापर केल्यानंतर त्यांना खर्चाचे पैसेही दिले गेले नाहीत, ज्यामुळे मुलींनी वारंवार पैशांची मागणी केल्याचे समोर आले आहे. यामध्ये घरकाम करणाऱ्या एका महिलेचेही अश्लील फोटो आणि व्हिडिओ आढळले. मुलींना नशा देऊन लैंगिक अत्याचार करून त्यांचे व्हिडिओ बनवले गेले आणि त्यांना ब्लॅकमेल करण्यात आल्याचा चाकणकर यांचा दावा आहे.

मानवी तस्करीचे रॅकेट?
चाकणकर यांनी सांगितले की, खेवलकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गेल्या दोन वर्षांपासून या मुलींशी संपर्क ठेवला होता. या पार्ट्यांमध्ये गांजा आणि कोकेनसारखे अमली पदार्थ आणण्याची पूर्वकल्पना होती. “खराडी, लोणावळा, गोवा, साकीनाका आणि जळगाव येथे अशा पार्ट्या आयोजित केल्या गेल्या. मध्यस्थांमार्फत मुलींना पाठवले जात होते. यात मोठ्या प्रमाणात मानवी तस्करी झाल्याची शक्यता आहे,” असे चाकणकर यांनी नमूद केले. अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग युनिटद्वारे या प्रकरणाचा तपास सुरू असून, पुणे पोलिसांना याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या.

एकनाथ खडसेंचा पलटवार: “पुरावे दाखवा, नाहीतर बदनामी थांबवा”
रूपाली चाकणकर यांच्या आरोपांवर पलटवार करताना एकनाथ खडसे म्हणाले, “चाकणकर चेकाळून बोलत आहेत. जर पुरावे असतील तर ते समोर आणावेत. हा गुन्हा नारकोटिक्सशी संबंधित आहे, मानवी तस्करीशी नाही. कोर्टच दोषी कोण ठरवेल. माझा जावई असला तरी पुरावे सापडले तर त्याला फाशी द्या, पण पुराव्याशिवाय बदनामी करू नका.” खडसे यांनी चाकणकर यांच्यावर राजकीय द्वेषातून आरोप करण्याचा दावा केला. “राज्य महिला आयोगाकडे कोणतीही तक्रार नसताना हे प्रकरण पोलिसांनी सांगायला हवे, चाकणकरांनी नव्हे. यात बदनामीचे षड्यंत्र आहे. याप्रकरणाचा तपास सीबीआयकडे द्यावा,” अशी मागणी खडसे यांनी केली. तसेच, चाकणकर यांनी लोढा प्रकरणातही लक्ष घालावे, असे सूचवले.

प्रकरणाचा पोलिस तपास –
पुणे पोलिसांनी खराडीतील रेव्ह पार्टीवर छापा टाकत खेवलकर यांच्यासह चौघांना अटक केली होती. यावेळी कोकेन, गांजा, १० मोबाइल्स, हुक्का पॉट आणि इतर अमली पदार्थ जप्त करण्यात आले. एका बहुउद्देशीय संस्थेने याप्रकरणी महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली होती, ज्याच्या आधारावर चाकणकर यांनी पोलिसांकडून अहवाल मागवला. “हा अहवाल भीषण आणि भयावह आहे. यात मानवी तस्करीचे रॅकेट असण्याची शक्यता आहे,” असे चाकणकर यांनी सांगितले.

राजकीय वाद पेटला –
या प्रकरणाने राजकीय वातावरण तापले असून, खडसे यांनी चाकणकर यांच्यावर राजकीय हेतूने बदनामीचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. “रोहिणी खडसे आणि चाकणकर यांचे मैत्रीचे संबंध सर्वांना माहीत आहेत. खासगी माहिती अशा प्रकारे उघड करणे चुकीचे आहे,” असे खडसे म्हणाले. दरम्यान, पोलिसांचा तपास सुरू असून, या प्रकरणात पुढील खुलासे काय होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आणखी संबंधित बातम्या

Anjali Damania on Rupali Chakankar : "नाशिकमध्ये जाऊन अशोक खरातचे पाय पदराने पुसले, आणि आता..."; चौकशीला हजर न राहिल्याने चाकणकरांवर दमानियांची टीका

2026-03-31 11:31:55

Anjali Damania on Rupali Chakankar : "नाशिकमध्ये जाऊन अशोक खरातचे पाय पदराने पुसले, आणि आता..."; चौकशीला हजर न राहिल्याने चाकणकरांवर दमानियांची टीका

Eknath Khadse: एकनाथ खडसेंच्या अडचणीत वाढ; खडसेंसह मुलीवर गुन्हा दाखल, काय आहे नेमकं प्रकरण?

2026-03-31 08:59:33

Eknath Khadse: एकनाथ खडसेंच्या अडचणीत वाढ; खडसेंसह मुलीवर गुन्हा दाखल, काय आहे नेमकं प्रकरण?

Eknath Shinde Meet CM Devendra Fadanvis : मोठी बातमी ! एकनाथ शिंदे थेट CM फडणवीसांच्या भेटीला

2026-03-30 21:01:56

Eknath Shinde Meet CM Devendra Fadanvis : मोठी बातमी ! एकनाथ शिंदे थेट CM फडणवीसांच्या भेटीला

Sharad Pawar : शरद पवारांच्या 'या' आमदारावर गुन्हा दाखल; राजकीय वर्तुळात खळबळ

2026-03-30 17:15:01

Sharad Pawar : शरद पवारांच्या 'या' आमदारावर गुन्हा दाखल; राजकीय वर्तुळात खळबळ

Top 10 News : जगावर पुन्हा कोरोनाचं संकट? ते दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार?..; वाचा आजच्या टॉप दहा बातम्या

2026-03-29 17:01:04

Top 10 News : जगावर पुन्हा कोरोनाचं संकट? ते दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार?..; वाचा आजच्या टॉप दहा बातम्या