Lonikand Police Station: …अन् महिला अधिकाऱ्यानेच न्याय दिला; गुन्ह्याचा तपास अधिकारी बदलला
Lonikand Police Station : दैनिक प्रभातने या संदर्भात वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर या प्रकरणाला न्याय मिळाल्याची भावना फिर्यादी महिलेकडून व्यक्त

वाघोली : लोणीकंद पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी दोन गुन्हे दाखल असून या दोन गुन्ह्याचा तपासावरून एका महिलेने सहाय्यक पोलीस निरीक्षकावर आरोप करत त्याची तक्रार पोलीस आयुक्तांकडे केली होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनीता रोकडे यांनी याप्रकरणी तातडीने फिर्यादी महिलेच्या गुन्ह्याचा तपास एका महिला पोलीस अधिकारीकडे दिला असल्याची माहिती दिली आहे.
फिर्यादी महिलेच्या मागणीनुसार तातडीने तपास अधिकारी बदलला असल्याने एक वरिष्ठ पोलीस अधिकारी महिला असून देखील त्यांनी तातडीने महिलेला न्याय दिल्याची चर्चा आहे.
फिर्यादी महिलेच्या गुन्ह्यात सहाय्यक पोलीस निरीक्षकाने मदत न करता परस्परविरोधी गुन्ह्याचा तपास अधिकारी नसताना देखील तिच्या नातेवाईकांना दोन वेळा अटक करण्याची भाषा करून दमदाटीत केल्याचा आरोप होता. हे आरोप जरी सहाय्यक पोलीस निरीक्षकांनी फेटाळले असले तरी देखील या घटनेला फिर्यादी महिलेचे चार नातेवाईक हजर असल्याने प्रकरणाला चौकशीची वळण लागले होते.
या प्रकरणाची चौकशीनंतर अनेक बाबी उघड जरी होणार असल्या तरीदेखील महिला पोलीस वरिष्ठ अधिकारी तातडीने महिलेच्या न्यायाच्या बाबतीत दखल घेतात याचे लोणीकंद पोलीस ठाणे उत्तम उदाहरण असल्याची चर्चा सर्वत्र होऊ लागली आहे. दैनिक प्रभात या संदर्भात वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर या प्रकरणाला न्याय मिळाल्याची भावना फिर्यादी महिलेने व्यक्त केली आहे.





