Video : अनंत अंबानींचे प्राणीप्रेम! दुप्पट किंमत देऊन खरेदी केल्या कोंबड्या, नक्की कारण काय? वाचा

Anant Ambani Viral Video | उद्योगपती मुकेश अंबानी यांचे पुत्र अनंत अंबानी सध्या भक्तिमार्गावर आहेत. आपल्या 30व्या वाढदिवसानिमित्त अनंत अंबानी जामनगरहून पायी चालत भगवान कृष्णाची नगरी असलेल्या द्वारकाला निघाले आहेत. या पदयात्रेदरम्यानचा त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ते शेकडो कोंबड्यांसाठी देवदूत बनून उभे राहिले आहेत.
अनंत अंबानींचे प्राणीप्रेम सर्वांनाच परिचयाचे आहे. त्यांचे हे प्राणी प्रेम पदयात्रेदरम्यान पाहायला मिळाले. अनंत अंबानी यांनी पदयात्रेदरम्यान कत्तलखान्यात नेल्या जाणाऱ्या या कोंबड्यांना पाहिले. यावेळी या कोंबड्यासाठी एकप्रकारे देवदूत बनवून ते समोर आले. त्यांनी त्वरित गाडीतील सर्व कोंबड्यांना विकत घेण्याचा निर्णय घेतला. यासाठी दुप्पट पैसे देण्याची देखील तयारी दर्शवली.
या कोंबड्या खरेदी करत पाळण्याची तयारी देखील दर्शवली. याचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये अनंत यांनी स्वतः एका कोंबडीला आपल्या हातात घेतलेले दिसत आहे. तसेच, गाडी मालकाला कोंबड्यांची पूर्ण किंमत देण्यास सांगत आहेत.
अनंत अंबानी की ये वीडियो आपका दिल जीत लेगी।
जामनगर से द्वारिका जाते वक्त अनंत को एक टेम्पो के अंदर मुर्ग़े मुर्गियाँ दिख गई जो कटने के लिए जा रही थी।
अनंत अंबानी ने अपने लोगों को बोला इसके मालिक को इनके पैसे दे दो,और इनको अब हम पालेंगे।❤️🚩❤️#Anantambani #NitaAmbani… pic.twitter.com/nLOWDsGGBN
— Sagar Kumar “Sudarshan News” (@KumaarSaagar) April 1, 2025
दरम्यान, अनंत अंबानी गेल्या पाच दिवसांपासून ही पदयात्रा करत आहेत. सुमारे 140 किलोमीटरचे हे अंतर पार करण्यासाठी ते दररोज रात्री 10 ते 15 किलोमीटर चालतात. ते 10 एप्रिल रोजी आपल्या वाढदिवशी द्वारकेला पोहोचून पूजा-अर्चा करणार आहेत. रिपोर्टनुसार, वाहतुकीला कोणताही अडथळा येऊ नये. यासाठी ते रात्रीच्या वेळी प्रवास करतात.
दरम्यान, कोंबड्यांना वाचवतानाचा अनंत यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अनेकजण त्यांच्या या कृतीचे कौतुक करत आहेत. त्यांनी पक्षी व प्राण्यांबद्दल विशेष प्रेम आहे. गुजरातमध्ये वन्यजीव संरक्षण केंद्र – वनतारा देखील स्थापन केले आहे. वनतारा येथे 2 हजारांपेक्षा अधिक प्रजातीचे लाखो वन्यजीव आहेत.





