डोनाल्ड ट्रम्प ज्युनिअरकडून अनंत अंबानींच्या ‘वनतारा’ संवर्धन प्रयत्नांची प्रशंसा

Donald Trump Jr visits Anant Ambani’s Vantara : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे ज्येष्ठ पुत्र डोनाल्ड ट्रम्प ज्युनिअर यांनी नुकतीच रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांचे पुत्र अनंत अंबानी यांच्या ‘वनतारा’ (Vantara) वन्यजीव बचाव आणि पुनर्वसन केंद्राला भेट दिली. जामनगर येथील या सुविधेचा दौरा करून त्यांनी अनंत अंबानींच्या प्राणी कल्याण आणि संवर्धनाच्या कामाचे कौतुक केले.
ट्रम्प ज्युनिअर यांनी ‘वनतारा’ला “जगातील एक आश्चर्य” असे संबोधले. “प्राण्यांचे बचाव करून त्यांना हे नवीन जीवन देण्यामागील दूरदृष्टी आणि संवर्धनाचा मोठा फायदा मी पाहिला,” असे ते म्हणाले. बचावलेल्या प्राण्यांसाठी त्यांचे नैसर्गिक अधिवास पुन्हा तयार करण्याच्या प्रयत्नांचीही त्यांनी प्रशंसा केली.
#WATCH | During his visit to Jamnagar, Donald Trump Jr. toured Anant Ambani’s Vantara initiative and expressed appreciation for its scale, vision, and commitment to wildlife rescue and conservation. pic.twitter.com/TkkLP3k8Cq
— ANI (@ANI) November 22, 2025
ट्रम्प ज्युनिअर उद्योगपती राजू रामलिंगा मांटेना यांच्या मुलीच्या विवाह सोहळ्यासाठी भारतात आले आहेत. वनतारा दौऱ्यापूर्वी त्यांनी ताज महालालाही भेट दिली होती.
दरम्यान, ‘वनतारा’ केंद्राला सर्वोच्च न्यायालयानेही पाठिंबा दर्शवला आहे. हत्तीच्या स्थलांतरासंबंधी दाखल याचिका फेटाळताना न्यायालयाने म्हटले की, जंगली हत्तींसाठी बचाव आणि पुनर्वसनाचा हा सर्वोत्तम पर्याय आहे. एका विशेष तपास पथकाने (SIT) तपास केल्यानंतर, या केंद्रात भारतीय कायद्याचे किंवा आंतरराष्ट्रीय संवर्धन पद्धतींचे कोणतेही उल्लंघन झाले नसल्याचे आढळले आहे.




