Anant Ambani : अनंत अंबानी यांची ‘जामनगर ते द्वारका’ पदयात्रा पूर्ण; काय म्हणाले पाहा…. Video

Anant Ambani | Dwarkadhish Temple : रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे संचालक अनंत अंबानी यांची जामनगर ते द्वारकाधीश मंदिर अशी पदयात्रा आज पूर्ण झाली. आज (दि. ६) राम नवमीच्या दिवशी ते द्वारकाधीश मंदिरात पोहोचले आहेत. अनंत अंबानी म्हणाले की, ‘हा माझा स्वतःचा धार्मिक प्रवास आहे. देवाचे नाव घेऊन प्रवास सुरू झाला आणि देवाचे नाव घेऊन प्रवास पूर्ण झाला’.
ते म्हणाले की, भगवान श्री द्वारकाधीश आमच्यावर खूप दयाळू आहेत आणि देवाने आम्हाला शक्ती दिली होती, तेव्हाच आम्ही प्रवास सुरू केला आणि आता हा प्रवास संपणार आहे, यासाठी मी भगवान श्री द्वारकाधीशांचे खूप खूप आभार मानतो’.
#WATCH | Devbhumi Dwarka, Gujarat | ‘Padyatra’ of Anant Ambani, Director, Reliance Industries Limited, from Jamnagar to Dwarkadhish Temple, completed today and arrived at Dwarkadhish Temple on the occasion of #RamNavami2025.
Anant Ambani says, “I extend my best wishes to all on… pic.twitter.com/JhL6KGkqvQ
— ANI (@ANI) April 6, 2025
अनंत अंबानी म्हणाले की आज माझी पत्नी आली आहे आणि माझी आईही येणार आहे. माझ्या वडिलांनी नेहमीच मला पाठिंबा दिला आहे, जेव्हा मी त्यांना या प्रवासात जाण्याबद्दल सांगितले तेव्हा त्यांनी मला खूप बळ आणि शक्ती दिली. मी माझ्या आजी, सासू आणि सासरे यांच्यासह सर्वांचे आभार मानू इच्छितो’. असं ते यावेळी म्हणाले आहेत.
अनंत अंबानींनी केला ११० किमी प्रवास :
अनंत अंबानी यांच्या आई आणि रिलायन्स फाउंडेशनच्या संस्थापक-अध्यक्षा नीता अंबानी म्हणाल्या की, ‘एक आई म्हणून, माझा धाकटा मुलगा अनंत द्वारकाधीशाच्या या दिव्य स्थानाची पदयात्रा पूर्ण करत असल्याचे पाहणे खूप अभिमानाची गोष्ट आहे’.
#WATCH | Devbhumi Dwarka, Gujarat | ‘Padyatra’ of Anant Ambani, Director, Reliance Industries Limited, from Jamnagar to Dwarkadhish Temple, completed today and arrived at Dwarkadhish Temple on the occasion of #RamNavami2025.
Anant Ambani’s mother & Reliance Foundation… pic.twitter.com/B5KZvSdi1Y
— ANI (@ANI) April 6, 2025
गेल्या १० दिवसांपासून, अनंतच्या पदयात्रेत सहभागी असलेले सर्व तरुण आपली संस्कृती पसरवत आहेत. मी द्वारकाधीशांना अनंतला शक्ती देण्याची प्रार्थना करतो. अनंत अंबानी यांनी ११० किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला. असं नीता अंबानी यावेळी म्हणाल्या. त्यांचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.





