आनंदराज आंबेडकर यांचा वंचित आघाडीला रामराम
Updated On:

औरंगाबाद : रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी औरंगाबादेत मोठं वक्तव्य केले आहे. वंचित बहुजन आघाडी पासून वेगळे होत असल्याचे जाहीर केले आहे. ते आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्तार प्रसंगी औरंगाबादेत आले होते.
यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मागील वर्षी झालेल्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला यश मिळवता आले नाही म्हणून आंबेडकरी समाजामध्ये नैराश्य आल्याचे त्यांनी सांगितले.
आंबेडकरी चळवळ स्वतःच्या पायावर उभी राहावी म्हणून आम्ही वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा दिला होता. मात्र आता औरंगाबाद महानगर पालिकेच्या सर्व जगावर रिपब्लिकन सेना लढवेल असे ते म्हणाले. आंबेडकरी गटातटांना एकत्र करण्यासाठी प्रयत्न करू तसेच यापुढेही समाजाच्या समस्या सोडवू असे त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.





