“आंबेडकरी जनतेशी विश्वासघात”; शिंदे आणि आनंदराज यांच्या युतीवर प्रकाश आंबेडकरांची तीव्र नाराजी

Prakash Ambedkar | उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आगामी स्थानिक स्वराज निवडणूकांपूर्वी नवा डाव टाकल्याची चर्चा आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आणि ‘रिपब्लिकन सेने’चे संस्थापक-अध्यक्ष आंनदराज आंबेडकर यांनी शिंदे गटासोबत युती केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. मात्र या युतीवर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
आनंदराज आंबेडकरांच्या निर्णयामुळे आम्हाला फक्त निराशा झाली नाहीये, तर हे वेदनादायक आहे अशी तीव्र भावना वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी म्हंटले आहे. याबाबत ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या पक्षाकडून या युतीवर प्रसिद्ध पत्रक जारी केले आहे. ‘सदर युती म्हणजे फुले-शाहू- आंबेडकर विचारांशी प्रतारणा असून आंबेडकरी जनतेशी विश्वासघात आहे. जन सुरक्षा विधेयक आणून दलित-आदिवासी-मुस्लीमांच्या चळवळी दडपणाऱ्या सरकारशी आनंदराज कशी काय युती कशी काय करु शकतात, असा सवाल या पत्रकात केला आहे. Prakash Ambedkar |
प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं की, पत्रकार परिषदेत आनंदराज आंबेडकर यांनी भाजपा आणि त्यांच्या मित्रपक्षांच्या विशेषतः शिवसेनेच्या तसेच संविधान, फुले-शाहू-आंबेडकर विचारसरणी आणि भारतीय प्रजासत्ताक विरुद्धच्या त्यांच्या अजेंड्यावर पांघरूण घालण्यात गुंतले होते. Prakash Ambedkar |
आनंदराज आंबेडकर यांनी महायुतीच्या ‘माझी लाडकी बहीण योजनांचे कौतुक केले. कदाचित, ते विसरले असतील की महाराष्ट्र सरकारने यावर्षी एससी, एसटीसाठी राखीव ठेवलेले ७४६ कोटी रुपये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेकडे वळवले आहेत. आनंदराज आंबेडकर यांनी निधी वळवण्याची केलेली पाठराखण ही एससी, एसटी निधी वळणाच्या विरोधात लढणाऱ्या आंबेडकरी जनतेशी विश्वासघात आहे. Prakash Ambedkar |
रिपब्लिकन सेनेला पाठिंबा दिला पण…
दरम्यान, आनंदराज यांचे मोठे बंधु ॲड. प्रकाश आंबेडकर यांची ‘वंचित बहुजन आघाडी’ हा राजकीय पक्ष आहे. आनंदाज यांनी अमरावतीमधून २०२४ ची लोकसभा निवडणूक वंचित बहुजन आघाडीच्या वतीने लढविली होती.
त्यावर प्रकाश आंबेडकर म्हणाले की, आम्ही यापूर्वीच्या निवडणुकीत आनंदराज आंबेडकरांच्या रिपब्लिकन सेनेला पाठिंबा दिला होता. आनंदराज आंबेडकरांच्या विनंतीवरून, आम्ही रिपब्लिकन सेनेला सामावून घेतले, त्यांना पाठिंबा दिला आणि त्यांच्या उमेदवारांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या एबी फॉर्मवर निवडणूक लढवली.
रिपब्लिकन सेनेच्या भाजपच्या मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेसोबतच्या बाबासाहेबविरोधी युतीवर वंचित बहुजन आघाडीची भूमिका —
आता निर्णय फुले-शाहू-आंबेडकरवाद्यांवर आहे. त्यांना संविधानाच्या जागी मनुस्मृती आणण्याची विचारसरणी असलेल्या आरएसएस-भाजपच्या बाहुल्यासोबत उभे राहायचे आहे की, ज्याची… pic.twitter.com/KuOg96udsK
— Vanchit Bahujan Aaghadi (@VBAforIndia) July 16, 2025
आम्ही २०२४ च्या लोकसभा निवडणुकीतही हेच सौजन्य दाखवले आणि आनंदराज आंबेडकर यांनी आमच्या पाठिंब्याने अमरावती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. हे सौजन्य आता संपत आहे, असं प्रकाश आंबेडकरांनी जाहीर केले.
आरएसएस-भाजपच्या हातचे बाहुले झालेल्यांना जागा नाही
वंचित बहुजन आघाडी वेगवेगळ्या मुद्द्यावर मतभेद सामावून घेऊ शकते, परंतु, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधी आणि आरएसएस-भाजपच्या हातचे बाहुले झालेल्या लोकांच्या विचारांना जागा नाही. आता निर्णय फुले-शाहू-आंबेडकरवाद्यांवर आहे. त्यांना संविधानाच्या जागी मनुस्मृती आणण्याची विचारसरणी असलेल्या आरएसएस-भाजपच्या बाहुल्यासोबत उभे राहायचे आहे की, ज्याची विचारसरणी संविधानाच्या रक्षणासाठी आहे अशा व्यक्तीसोबत उभे राहायचे आहे. Prakash Ambedkar |
आनंदराज आंबेडकरांच्या निर्णयामुळे आम्ही निराश आहोत. ही भावना केवळ आमच्यापुरती मर्यादित नाही याची आम्हाला खात्री आहे. त्यामुळे आनंदराज आंबेडकरांच्या निर्णयामुळे नाराज असलेल्या रिपब्लिकन सेनेच्या सदस्यांना, कार्यकर्त्यांना, पदाधिकारी यांना वंचित बहुजन आघाडीत सामील होण्याचे आवाहन प्रकाश आंबेडकरांनी केले. Prakash Ambedkar |
हेही वाचा:
डोनाल्ड ट्रम्पच्या ‘टॅरिफ बॉम्ब’ने अमेरिका झाला ‘मालामाल’ ; तब्बल ५० अब्ज डॉलर्सचा बंपर नफा





