Anahat Squash History : १८ वर्षांच्या अनाहत सिंहने रचला इतिहास! जागतिक ज्युनियर स्क्वॅश जेतेपद पटकवणारी ठरली पहिली भारतीय खेळाडू
Anahat Squash History : भारताची १८ वर्षीय स्टार स्क्वॉशपटू अनाहत सिंहने तिहास रचत जागतिक ज्युनियर स्क्वॉश चॅम्पियनशिपचे विजेतेपद पटकावले आहे.

Anahat Singh Wins World Junior Squash Championship Title : एकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष ग्लास्गो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेकडे लागलेले असताना, दुसरीकडे कॅनडामध्ये भारतीय क्रीडा क्षेत्रासाठी अत्यंत अभिमानास्पद आणि ऐतिहासिक बातमी समोर आली आहे. भारताची १८ वर्षीय स्टार स्क्वॉशपटू अनाहत सिंहने (Anahat Singh) इतिहास रचत जागतिक ज्युनियर स्क्वॉश चॅम्पियनशिपचे (World Junior Squash Championship) विजेतेपद पटकावले आहे. फायनलच्या हाय-व्होल्टेज लढतीत तिने इजिप्तच्या (Egypt) बलाढ्य खेळाडूचा धुव्वा उडवला. या स्पर्धेचे विजेतेपद मिळवणारी ती भारताच्या इतिहासातील पहिलीच खेळाडू ठरली आहे.
इजिप्तच्या प्रतिस्पर्ध्याला लोळवले; सेटमध्ये दिली नाही संधी –
कॅनडामध्ये खेळल्या गेलेल्या या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात अनाहत सिंहचा सामना इजिप्तच्या दुसरी मानांकित रुकय्या सालेमशी (Ruqayya Salem) होता. अनाहतने सुरुवातीपासूनच सामन्यावर पकड ठेवत रुकय्याला पुनरागमन करण्याची एकही संधी दिली नाही. तिने सरळ तीन सेटमध्ये ११-३, ११-७ आणि ११-९ अशा फरकाने विजय मिळवून विश्वविजेतेपदावर भारताचे नाव कोरले.
HISTORIC WORLD TITLE FOR ANAHAT SINGH! 🇮🇳🏆
Anahat Singh has etched her name into squash history by becoming the first non-Egyptian in 16 years to win the World Junior Women’s Singles title.
The last time a player outside Egypt lifted the Women’s Singles crown was in 2010,… https://t.co/LCpvSrBKag pic.twitter.com/CykLEKkPck
— IndiaSportsHub (@IndiaSportsHub) July 26, 2026
जोशना चिनप्पाचा २१ वर्षे जुना रेकॉर्ड मोडला-
History Made! 🇮🇳
Congratulations to Anahat Singh (@Anahat_Singh13) on becoming the first Indian ever to win the World Squash Junior Championship.
A phenomenal achievement and a proud moment for every Indian. pic.twitter.com/SfURD0Zg69
— Dr Mansukh Mandaviya (@mansukhmandviya) July 25, 2026
२००५ मध्ये जोशना चिनप्पाने या स्पर्धेच्या फायनलमध्ये धडक मारली होती, मात्र तिला विजेतेपद मिळवता आले नव्हते. तब्बल २१ वर्षांनंतर या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचणारी अनाहत पहिली भारतीय ठरली आणि तिने थेट जेतेपद पटकावून इतिहास घडवला. तिच्या या अभूतपूर्व यशाबद्दल केंद्रीय क्रीडामंत्री मनसुख मांडविया यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत लिहिले, “इतिहास रचला गेला! जागतिक ज्युनियर स्क्वॉश चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली भारतीय बनल्याबद्दल अनाहत सिंहचे हार्दिक अभिनंदन! ही कामगिरी प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा क्षण आहे.”
२०२८ लॉस एंजिल्स ऑलिम्पिकचे तिकीट पक्के?
India’s National Anthem plays as Anahat Singh wins World Jr Squash C’ship 🏆
Goosebumps. Pride. History. 🇮🇳🫡 pic.twitter.com/vMmj64dDwQ
— The Khel India (@TheKhelIndia) July 26, 2026
२०२८ मध्ये लॉस एंजिल्स येथे होणाऱ्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत स्क्वॉश या खेळाचा पहिल्यांदाच समावेश करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत अनाहतने मिळवलेले हे विश्वविजेतेपद भारतासाठी ऑलिम्पिक पदकाची आशा वाढवणारे आहे. सध्या वरिष्ठ पीएसए (PSA) जागतिक क्रमवारीत टॉप-२० मध्ये असणाऱ्या अनाहत सिंहकडून आता सीनियर स्तरावरही अशाच ऐतिहासिक कामगिरीची देशाला अपेक्षा आहे.





