ST Bus Accident: बारामतीतील सुपे घाटात विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी एसटी बस उलटली; चार विद्यार्थी जखमी
ST Bus Accident: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी जखमी विद्यार्थ्यांच्या प्रकृतीची माहिती घेतली

ST Bus Accident: बारामती तालुक्यातील सुपे घाटात आज सकाळी विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी एसटी बस चालकाचा ताबा सुटल्याने उलटली. बसमध्ये सुमारे ६० ते ७० विद्यार्थी-विद्यार्थिनी प्रवास करत होते. या अपघातात चार विद्यार्थी जखमी झाले असून, त्यापैकी दोघांना पुढील उपचारासाठी लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही एसटी बस चौफुल्याकडून सुप्याच्या दिशेने विद्या प्रतिष्ठानच्या विद्यार्थ्यांना घेऊन जात होती. सुपे घाटातील पहिल्या वळणावर बस चढत असताना चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने बस मागे सरकली आणि रस्त्याच्या कडेला उलटली झाली.
बसने एक पलटी घेतल्यानंतर विद्यार्थ्यांनी तातडीने बसमधून बाहेर पडत सुरक्षित ठिकाणी आश्रय घेतला. या घटनेत चार विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती विद्या प्रतिष्ठान इंग्लिश मीडियम स्कूलचे प्राचार्य योगेश पाटील यांनी दिली.
सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही
घाटातील अपघाताचा आवाज ऐकून स्थानिक ग्रामस्थ व परिसरातील प्रवाशांनी तातडीने मदतीसाठी घटनास्थळी धाव घेतली. बसमधील जखमी विद्यार्थ्यांना तातडीने बाहेर काढून उपचारासाठी नजीकच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांचे पथक जखमी विद्यार्थ्यांवर तात्काळ उपचार करत असून, सुदैवाने कोणतीही मोठी जीवितहानी झाल्याचे वृत्त अद्याप आलेले नाही. ST Bus Accident
View this post on Instagram
दरम्यान, या भीषण अपघाताची माहिती मिळताच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युगेंद्र पवार यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. तसेच त्यांनी रुग्णालयात जाऊन जखमी विद्यार्थ्यांची विचारपूस केली.
सुनेत्रा पवार यांनी जखमी विद्यार्थ्यांच्या प्रकृतीची माहिती घेतली
घटनेची माहिती मिळताच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी संबंधित शाळेचे मुख्याध्यापक तसेच रुग्णालयातील डॉक्टरांशी फोनवर संवाद साधत जखमी विद्यार्थ्यांच्या प्रकृतीची माहिती घेतली. तसेच विद्यार्थ्यांना आवश्यक वैद्यकीय उपचार आणि योग्य आरोग्यसेवा मिळावी, याबाबत त्यांनी संबंधितांना आवश्यक सूचना दिल्या. ST Bus Accident
रोहित पवार यांनी देखील ट्वीट करत, ‘प्रशासनाने तातडीने या अपघाताची सखोल चौकशी करावी आणि विद्यार्थीच काय एसटीने प्रवास करणाऱ्या कोणत्याही सामान्य माणसाचा जीव धोक्यात येणार नाही, याची काळजी घ्यावी,’ असे आवाहन केले आहे.
हेही वाचा:
Nevase News : प्रशासनाच्या आदेशाला हरताळ; कुकाण्यात विनापरवानगी डीजे वाजवणाऱ्यांवर कारवाई





