Amruta Khanwilkar : ‘चंद्रमुखी’ने घेतले तिरुपती बालाजीचं दर्शन; अमृताने पोस्ट शेअर करत व्यक्त केल्या भावना
Amruta Khanwilkar : अमृता खानविलकरने तिरूपती बालाजीच्या दर्शनाचे काही खास फोटो आणि दर्शनाचा अनुभव शेअर केला आहे.

Amruta Khanwilkar : मराठी सिनेसृष्टीची ‘चंद्रमुखी’ अर्थात अभिनेत्री अमृता खानविलकर सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. कामाबद्दलच्या अपडेट आणि वैयक्तिक आयुष्यातील काही प्रसंग ती चाहत्यांसोबत शेअर करताना दिसते.
नुकतेच अमृता खानविलकरने तिरुपती बालाजीचं दर्शन घेतलं. तिने तिरूपती बालाजीच्या दर्शनाचे काही खास फोटो आणि अनुभव शेअर केला आहे. अमृता खानविलकर आईसह तिरुपतीला पोहोचली होती.
अमृताने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात तिने लिहिले की, “काही क्षण असे असतात की ते क्षणिक वाटले तरी आयुष्याला वेगळी दिशा देणारे ठरतात. काही दिवसांपूर्वी जर मी स्वतःलाच सांगितलं असतं की मी भगवान वेंकटेश्वरांच्या समोर उभी राहीन, तर कदाचित मला स्वतःलाच त्यावर विश्वास बसला नसता, पण काल मी तिथे प्रत्यक्ष उभी होते”.
“मागच्या महिन्यात ठरवलं की आपण तिरूपती बालाजीचं दर्शन घ्यायला जायचं आणि आज इकडे आले. इतकं सुंदर दर्शन झालंय की मला आता काही सुचत नाही. या सुंदर दर्शनाने माझं हृदय अगदी भरून आलं आहे. दर्शन घेतल्यानंतर मी खूपच भावुक झाले.”
तिने पुढे लिहिलं की, “फक्त एक साधा विचार आणि देवाला भेटण्याची मनापासूनची इच्छा यामुळे हा प्रवास सुकर झाला. नक्कीच असं वाटतं की हे त्यांचंच बोलावणं होतं. कधी कधी जेव्हा ‘त्यांची’ इच्छा असते, तेव्हा आपण फक्त त्यांच्यामागे चालत राहायचं असतं. ‘गोविंदा गोविंदा'”, अशा शब्दांत तिने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
Instagram पर यह पोस्ट देखें
यावेळी अमृताने या प्रवासात मदत करणाऱ्या अमर आणि वसु यांच्यासह मार्गदर्शन करणाऱ्यासाठी ओम राऊत यांचेही आभार मानले. अमृताने तिरूपती बालाजीच्या दर्शनासाठी पांढऱ्या रंगाची कॉटनची साडी परिधान केली होती. या लुकमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. तिचे हे फोटो लक्ष वेधून घेत आहेत.
दरम्यान, अमृता नुकतीच ‘तस्करी’ या वेबसीरिजमध्ये एका महिला कस्टम अधिकाऱ्याची भूमिका पाहायला मिळाली. यात तिने अभिनेता इमरान हाशमीसोबत स्क्रीन शेअर केली. ती सध्या ‘लग्न पंचमी’ या नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या नाटकातील तिची भूमिका लक्षवेधी असून अभिनेता स्वप्नील जोशीही मुख्य भूमिकेत आहे.
हेही वाचा:






