श्रेया बुगडेचा नवीन प्रवास; शेअर केला खास अनुभव

Shreya Bugade | झी मराठीवरील ‘चला हवा येऊ द्या’ या शोमधून अभिनेत्री श्रेया बुगडे घराघरात पोहचली. या शोनंतर आता श्रेया ‘झी मराठी’ वाहिनीवरच्या ‘ड्रामा ज्युनिअर्स’ या नव्या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात ती सूत्रसंचालिकेची जबाबदारी निभावणार आहे. 22 जूनपासून या शोला सुरूवात होणार आहे. यानिमित्त तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.
श्रेया बुगडेने पोस्टमध्ये लिहिले की, “खरंतर २७ वर्षांपूर्वी मी बालकलाकार म्हणून या मनोरंजन क्षेत्रात आले आणि इथेच रमले. साधारण २१ वर्षांपूर्वी ‘तुझ्याविना’ या मालिकेच्या निमित्ताने मी ‘झी’ परिवारात सामील झाले आणि टीव्हीचा उंबरठा ओलांडून तुमच्या घरात आले. तेव्हापासूनच आपलं एक वेगळं नातं आहे. नातं आपुलकीचं, प्रेमाचं आणि जबाबदारीचं…होय जबाबदारीचं सुद्धा… कारण सांगते!
View this post on Instagram
एकदा प्रेक्षकांमध्ये बसलेल्या एक काकू सहज बोलता-बोलता म्हणाल्या “मला जर मुलगी झालीना तर तिचं नाव मी ‘श्रेयाच’ ठेवेन. तुझ्यासारखीच होऊदे पोर माझी मला एवढं ‘धस्स’ झालं होतं त्या दिवशी, बापरे! पुढे, त्या काकूंना ‘श्रेया’ झाली की ‘श्रेयस’ ते काही मला कळलं नाही. पण, माझी मात्र जबाबदारी वाढली कारण अशाच काही काकू, काका, दादा, ताईंची चिमुरडी घेऊन पुन्हा एकदा टीव्हीचा उंबरठा ओलांडून मी तुमच्या घरी येतेय !! आजपासून सुरु होणाऱ्या ‘ड्रामा ज्युनिअर्स’ या शोचं सूत्रसंचालन मी करणार आहे. पुन्हा एक नवीन प्रवास सुरु करणार आहे.
‘झी मराठी’ आणि मी आमच्या या जोडीला तुम्ही कायम खूप प्रेम आणि यश दिलंत, या नवीन प्रवासात आमच्याबरोबर जोडलेल्या सगळ्यांना पण तसंच भरभरून प्रेम द्याल याची खात्री आहे. आजपासून आम्ही येतोय आमच्या गँगबरोबर… भेटू मग आज आणि उद्या रात्री ९-१० वाजता…”, असे म्हणत श्रेयाने तिच्या नवीन प्रवासाबाबत लिहिले आहे. दरम्यान, ‘ड्रामा ज्युनिअर्स’ कार्यक्रमात संकर्षण कऱ्हाडे आणि अमृता खानविलकर हे परीक्षकाची जबाबदारी सांभाळणार आहेत. Shreya Bugade |
हेही वाचा:
थलपथी विजयच्या वाढदिवसाला चाहत्याने केला स्टंट, स्वतःला घेतले ‘पेटवून’





