‘तू पतीसोबत कधीच का फिरत नाही?’ नेटकऱ्याच्या प्रश्नाला अमृता खानविलकरने दिलं उत्तर

Amruta Khanwilkar| मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकरने मराठीसह हिंदी चित्रपटांमध्येही काम केले आहे. आपल्या अभिनयाच्या जोरावर तिने सिनेसृष्टीत मोठे स्थान मिळवले आहे. याशिवाय अमृता सोशल मीडियावर देखील सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. आईसोबतचे अनेक व्हिडिओ ती शेअर करताना दिसते. नुकतेच तिने आईसोबतचे लंडन ट्रीपचे काही फोटो शेअर केले आहेत. यादरम्यान एका नेटकऱ्याने अमृताच्या नवऱ्याबाबत एक प्रश्न विचारला. त्यावर अमृताने देखील उत्तर दिले आहे.
अमृताने इनस्टाग्रामवर लंडनच्या या ट्रीपचे फोटो-व्हिडिओ पोस्ट केले आहे. त्यावर एका इन्स्टाग्राम युजरने ‘तू हिमांशूसोबत कधीच का फिरत नाहीत. तुम्हा दोघांना एकत्र एखाद्या ट्रीपसाठी गेलेलं आम्ही क्वचित पाहिलं आहे. एकतर तू तुझ्या आईसोबत असते किंवा बहिणीसोबत, नवऱ्यासोबत कधी तरीच दिसतेस,’ असे म्हंटले आहे. Amruta Khanwilkar|
यावर अमृताने ‘हिमांशूचे इन्स्टाग्रामवर अकाउंट आहे, पण तो त्यावर सक्रिय नसतो. तो तसे कोणाला फॉलो करत नाही, पोस्ट करत नाही. त्यामुळे फोटो पोस्ट करण्याचा काही मुद्दाच नाही. शिवाय अशा काही गोष्टी आहेत ज्या पूर्णपणे खासगी ठेवायला आम्हाला आवडतात,” असे उत्तर दिले.
View this post on Instagram
अमृताच्या या उत्तरावर युजरने रिप्लाय दिला, ‘अमृता-हिमांशूचे आणखी एकत्र फोटो त्यांना बघायचे आहेत. कारण नच बलियेपासून आम्ही या जोडीचे चाहते आहोत.’ यावेळी या चाहतीने अमृताने तिच्या नवऱ्यासोबत काही फोटो पोस्ट करावे, अशी विनंती केली. चाहतीच्या या विनंतीनंतर अमृतानेही ‘नक्की’ असा रिप्लाय दिला. Amruta Khanwilkar|
अमृताच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, मागील वर्षी प्रदर्शित झालेला अमृताचा ‘चंद्रमुखी’ चित्रपट चांगलाच गाजला होता. यातील चंद्रा या गाण्याने सोशल मीडियावर धुमाकुळ घातला होता. त्यानंतर ती ‘लुटेरे’ या नव्या हिंदी वेबसीरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. यात अमृता खानविलकर महत्वाच्या भूमिकेमध्ये दिसणार आहे. अमृतासोबत रजत कपूर, विवेक गोंबर आणि आमिर अली हे देखील महत्वाच्या भूमिकेत आहेत. याशिवाय ती ‘कलावती’, ‘ललिता बाबर’, ‘पठ्ठे बापूराव’ या मराठी सिनेमांमध्ये देखील पाहायला मिळणार आहे.
हेहीवाचा:
मिहीर कोटेचा यांच्या कार्यालयाबाहेर राडा; भाजप आणि ठाकरे गट आमने-सामने, नेमकं काय घडलं?





